पिंपरी : पावसाळ्यात बांधकाम प्रकल्पांवर अपघात घडू नयेत, म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी क्रेडाईच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना दक्षता घेण्याबाबत पत्र दिले आहे. ‘पावसाळ्यात बांधकाम प्रकल्प आणि बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. तसेच अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नयेत, याबाबत विभागवार बीट निरीक्षकांना तपासणी करण्याचे आदेश दिले असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.पाऊस सुरू झाल्यापासून पुण्यात गेल्या दोन आठवड्यांत इमारत कोसळून अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. आयुक्तांनी याबाबत पत्रक जारी केले आहे. आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘एखादी घटना घडल्यानंतर दक्षता घेण्यासाठी आवाहन करण्यापेक्षा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने धोकादायक वाडे, इमारती मालकांना नोटीस दिल्या आहेत. क्रेडाईच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना आवाहन केले आहे. ज्या भागात बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प सुरू आहेत. त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.पावसाळ्यात अनधिकृतपणे बांधकामे करण्याबाबत लोक घाई करीत असतात. परवानगी घेऊन बांधकाम करणारे लोकांनीही पावसाळ्यात काम सुरू ठेवल्यास दक्षता न घेतल्यास अशा वेळी अपघाताची शक्यता असते.’’........धोकादायक वाडा मालकांना नोटीस ‘‘पावसाळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील धोकादायक इमारती वाड्यांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार धोकादायक इमारत मालकांना नोटीस दिल्या आहेत. नागरिकांनी धोकादायक वाडे, काढून घेणे अपेक्षित असते. धोकादायक इमारती काढून घ्याव्यात, अशा सूचना केल्या आहेत. याबाबत नागरिकांनी कार्यवाही न केल्यास महापालिकेच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाणार आहे,’’ असे हर्डीकर यांनी सांगितले.
बांधकाम मजूर सुरक्षेबाबत दक्षता घेण्याच्या सूचना:श्रावण हर्डीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 2:33 PM
पाऊस सुरू झाल्यापासून पुण्यात गेल्या दोन आठवड्यांत इमारत कोसळून अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत.
ठळक मुद्देबीट निरीक्षकांकडून तपासणी क्रेडाईच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना आवाहन धोकादायक वाडा मालकांना नोटीसपावसाळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील धोकादायक इमारती वाड्यांचे केले सर्वेक्षण