शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त; पोलिसांकडून तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 5:15 PM

गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी : बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त केली. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि. १२) रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई केली.

राजेश भिकू पडवळ (वय २६, रा. गोऱ्हे, खडकवासला, ता. हवेली), अतिश गोरख गायकवाड (वय २१, रा. ओटा स्कीम, निगडी), ऍनसन उर्फ तंबी ॲन्थेनीपॉल जेवियर (वय २९, रा. साईनगर, मामुर्डी, देहूरोड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरोडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक आशिष बनकर यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १३) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बेकायदा शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी कारवाई करून आरोपींना पकडले. त्यावेळी आरोपींकडे दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली.  पोलिसांनी एक लाख १५ हजार २०० रुपये किमतीचे दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे तसेच एक दुचाकी जप्त केली. 

दरम्यान, आरोपी अतिश गायकवाड याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून पोलिसांची किंवा शासनाची परवानगी न घेता आरोपी सतीश गायकवाड हा शहरात वावरताना मिळून आला, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीpimpale guravपिंपळेगुरवPoliceपोलिस