पिंपरी : दुचाकीस्वाराला अडवून मारहाण करत त्याच्याकडील रोकड लुटल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दिघी येथे भोसरी आळंदी रस्त्यावर घडली. गणेश प्रकाश भोसले (वय २२, रा. गल्ली नं. ३, चक्रपाणी वसाहत, पांडवनगर, भोसरी) याला अटक केली असून अजय पवार (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) हा फरार आहे. याप्रकरणी शांताराम विठ्ठल गारगोटे (वय ४०, रा. मु.पो. चिंबळी, बटवाल वस्ती रस्ता, मंत्री बिल्डिंग मागे, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सायंकाळी गारगोटे हे दिघीतील भोसरी-आळंदी रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरासमोरुन दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडविले. तु आमच्या गाडीला धक्का का मारला असे म्हणत त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर गारगोटे यांच्या खिशातील तीन हजारांची रोकड चोरुन नेली. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर फिर्यादी यांनी सांगितलेल्या वर्णनावरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दुचाकीस्वाराला मारहाण करत लुटली रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 4:07 PM