तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील महाविद्यालयीन युवती वैष्णवी लोहटच्या मृत्यूची चौकशी सीबीआय मार्फत करावी आणि या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस अधिकारी आणि शवविच्छेदन करणारे डॉक्टर यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी, पुणे जिल्हा जागतिक मानवाधिकार जनजागरण समितीचे सरचिटणीस प्रदीप नाईक यांनी केली आहे. महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.वैष्णवी हेमंत लोहट (वय १६, रा. तळेगाव दाभाडे) या युवतीचा २१ डिसेंबर २०१६ रोजी तळेगाव रेल्वे स्टेशनजवळ संशयास्पद मृत्यू झाला होता. रेल्वे या घटनेची जबाबदारी स्वीकारत नसताना पोलिसांना मात्र हा रेल्वे अपघात आहे की आत्महत्या हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांना तपास लावण्यास अपयश आल्याने हा गुन्हा सीबीआय कडे सोपविण्याची मागणी केली आहे. वैष्णवीच्या वडिलांनीही या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
लोहट मृत्युप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी
By admin | Published: April 27, 2017 4:57 AM