पिंपरी : पिंपरी पालिकेत विरोधात असताना भाजपाच्या नेत्यांनी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवून सभा कामकाजाचे चित्रीकरण करण्याची मागणी केली होती. पालिकेत आता भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे स्थायी समिती आणि महासभेच्या सभागृहात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवून सभा कामकाजाचे चित्रीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पालिकेकडे केली आहे.भापकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर म्हणाले, ‘‘सीसीटीव्हीमुळे पदाधिकारी, नगरसेवक नसलेले पक्षाचे पदाधिकारी पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचे दिसेल.’’
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ‘सीसीटीव्ही’ची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 6:09 AM