शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शहरात ‘पॉस’ मशिनद्वारे होतेय धान्यवाटप: रेशन दुकानातील काळाबाजारास बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 2:21 AM

रेशन दुकानातून आता ग्राहकांना ‘ई-पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप केले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हा प्रकल्प राबविला जात असून यामुळे धान्याचा काळाबाजार थांबण्यास मदत होणार आहे.

पिंपरी : रेशन दुकानातून आता ग्राहकांना ‘ई-पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप केले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात हा प्रकल्प राबविला जात असून यामुळे धान्याचा काळाबाजार थांबण्यास मदत होणार आहे.निगडीतील परिमंडल कार्यालयात अ आणि ज विभाग असून अ विभागामध्ये १०६ तर ज विभागामध्ये ९४ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. या दुकानांमधून केवळ शिधापत्रिकेवरच धान्य दिले जायचे. मात्र, आता यापुढे ‘ई-पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप केले जाणार आहे. ज्या दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकेतील नागरिकांच्या आधार क्रमांक जोडणीसह संदर्भ रजिस्टर कार्यालयात जमा झाले आहे. त्यानुसारच धान्य दिले जात आहे.यासाठी दुकानदारांना पॉस मशिन देण्यात आले आहे. ज्यांची आधार नोंदणी आहे तितक्या लोकांचे धान्यवाटप केले जात आहे. याबाबतची माहिती पॉस मशिनमध्ये संकलित असेल. पॉस मशिनची सर्व माहिती आॅनलाइन ठेवली जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांची संपूर्ण माहिती युनिट संख्या, आधार क्रमांक, धान्य वितरणाचे प्रमाण आदी माहिती पॉस मशिनमध्ये असेल. पॉस मशिनसाठी आवश्यक असणारे कामकाज जवळपास पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, अद्यापही काही जणांनी आधार जमा केलेले नाहीत. यापूर्वी आधार नसलेले धान्य घेऊन जात होते. आता तसे होणार नाही.माहितीचे संगणकीकरण झाल्यास नवीन नाव टाकणे, कमी करणे, बदल करणे अशा प्रकारचे कामकाज तातडीने होण्यास मदत होणार आहे. तसेच पेपरलेस कारभार होण्यासही हातभार लागणार आहे. आॅनलाइन कामकाज करण्यासाठी या माहितीचे संगणकीकरण फायदेशीर ठरणार आहे.