चाकण - किरकोळ कारणावरून २६ वर्षाच्या तरुणावर लोखंडी गज व काचेच्या बाटल्यांनी वार करून जखमी केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर चाकण पॉकीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना नाणेकरवाडी गावच्या हद्दीत समाधान चायनीज सेंटरवर १ जुलै रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. याबाबत महेश बबन कड ( वय २६, रा. कडाचीवाडी, हनुमान मंदिरा शेजारी, बादे वस्ती, तालुका खेड, जिल्हा पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी 1) संदीप कुसाळकर ( रा. मेदनकरवाडी, तालुका खेड ), 2) बाळासाहेब बांगर ( रा. नाणेकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे ), 3) अमोल लष्करे ( रा. नाणेकरवाडी, तालुका खेड ), 4) अण्णा उर्फ अमित माने ( रा. मेदनकरवाडी, तालुका खेड ) व त्यांचे सात ते आठ साथीदार यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६०२/२०१८ भा द वि कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १२० ब, १०९, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी क्रमांक एक व दोन यांचे व फिर्यादीचा भाऊ अक्षय कड व इतर साथीदार असे हनुमान मंदिरासमोर दिनांक १ जुलै रोजी सव्वा आठच्या सुमारास आरोपी नंबर एक व इतर यांनी त्यांना ठाकर वस्ती येथे जाण्याचा रस्ता चांगला आहे का चिखल आहे असे चेतन कडे विचारल. त्यावर आरोपी क्रमांक एक याने तुम्हाला रस्ता सांगता येत नाही का ? असे म्हणत म्हणाले ने भांडण झाले होते. सदर भांडणाचा राग मनात धरून आरोपी आरोपींनी कट रचून आरोपी नंबर १ व २ यांनी आरोपी नंबर २ ते ४ व त्यांचे इतर सात ते आठ साथीदार यांना सांगून व प्रेरणा दिल्याने आरोपी नंबर ४ यांनी फिर्यादीचे मोबाईलवर फोन करून आरोपी क्रमांक एक व दोन यांचे मालकीचे अपाचे मोटर सायकल ची चावी समाधान चायनीज सेंटर येथे घेऊन ये असे म्हणाल्याने फिर्यादी व फिर्यादीचा मित्र रोहित उर्फ सोन्या बिबीशन शितोळे मोटरसायकल ( नंबर एम एच १४ ईएफ ५१२१ ) वरून सदर ठिकाणी गेल्यावर आरोपी नंबर तीन व चार तसे त्यांचे इतर सात ते आठ साथीदारांनी बेकायदा जमाव जमवून काचेच्या बाटल्या लोखंडी गज अशा साहित्याने फिर्यादीच्या अंगावर धावून गेले, व आरोपी नंबर तीन याने त्याचे सोबत चे इतर सात ते आठ साथीदारांनी फिर्यादीचे डोक्यात, हातावर, पायावर लोखंडी गज व काचेच्या बाटल्यांनी मारहाण केली. व फिर्यादीचे डोक्यात आपखुशीने किरकोळ व गंभीर दुखापत केली. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पवार पुढील तपास करीत आहेत.
किरकोळ कारणावरून तरुणावर लोखंडी गज व काचेच्या बाटल्यांनी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 10:41 PM