चाकण - येथील कोहिनुर सेंटर मधील अकाउंटंट संतोष रामभाऊ सहाणे ( वय ४० ) यास अज्ञात इसमांनी बेकायदा जमाव जमवून मारहाण करून चार चाकी गाडीतून पळवून नेऊन अपहरण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आज दि. २० रोजी उशिरा चाकण पोलीस ठाण्यात १३ अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार नामदेव जाधव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना शनिवारी ( दि. १९ ) रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान कोहिनुर सेंटर समोर घडली. येथील कोहिनुर सेंटर मधील कोअर हॉस्पिटल मध्ये काम करणारा अकाउंटंट संतोष रामभाऊ सहाणे ( वय ४०, रा. मोशी, आळंदी रोड, ता.हवेली, जि.पुणे, मुळगाव आळे कोळवाडी, मांडवदरा, सहाणे वस्ती, ता.जुन्नर, जि.पुणे ) यास स्विफ्ट कार क्रमांक ( एम एच ४३ एल २३२३ ) व इनोव्हा कार क्रमांक ( एम एच १४ ईसी ११९९ ) अधून आलेल्या अज्ञात १२ ते १३ इसमांनी बेकायदा जमाव जमवून सहाणे यास मारहाण करून स्विफ्ट कार मध्ये बसवून खेड बाजूकडे पळवून नेले. याबाबत हॉस्पिटल मधील डॉ. प्रणव मिलिंद देशमुख ( वय २७, रा. कोअर हॉस्पिटल, चाकण ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८१/२०१८, भादंवि कलम ३६३, १४३, १४५, १४७ नुसार गुन्हा दाखल केक आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलिस पुढील तपास करीत आहेत.
कोअर हॉस्पिटलच्या अकाउंटंटचे मारहाण करून अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 9:56 PM