शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

विस्तारीत प्रभागाचे बंडोबांपुढे आव्हान

By admin | Published: February 17, 2017 5:00 AM

महापालिकेची २१ फेब्रुवारी २०१७ ला होत असलेली ही निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची आहे. प्रभागांची फेररचना झाली.

पिंपरी : महापालिकेची २१ फेब्रुवारी २०१७ ला होत असलेली ही निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची आहे. प्रभागांची फेररचना झाली. ४० ते ५० हजार मतदार संख्येचे विस्तारलेले प्रभाग अपक्ष निवडणूक लढणाऱ्यांसाठी जिकिरीचे ठरू लागले आहेत. १२८ जागांसाठी ३२ प्रभागांत निवडणूक होत असून, एकूण ७७४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील २३६ अपक्ष आहेत. विस्तारीत प्रभागात स्वत:च्या ताकतीवर प्रचार यंत्रणा राबविणे खर्चिक आणि न पेलविणारे असल्याने अनेक बंडखोर उमेदवार थंड पडले आहेत, तर काही जिद्द, चिकाटीच्या जोरावर निवडणूक रिंगणात तग धरून आहेत. महापालिका निवडणुकीचे उमेदवारीअर्ज दाखल करण्याअगोदर विविध राजकीय पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. भाजपाकडे ४४८ इच्छुक, तर राष्ट्रवादीकडे ४७० इच्छुक होते. शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या २७२ इतकी होती. काँग्रेसकडे २५०, मनसेकडे १२५, आरपीआयकडे १०० इच्छुक होते. परंतु तिकीटे कापल्याने अनेकांनी बंडखोरी केली. (प्रतिनिधी)