शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

निष्ठावान कार्यकर्ते टिकविण्याचे आव्हान

By admin | Published: January 31, 2017 4:01 AM

भाजपा, शिवसेना युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ एकदाचे थांबले. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडीची शक्यता असल्यामुळे महापालिका निवडणूक कोणत्याही

रहाटणी : भाजपा, शिवसेना युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ एकदाचे थांबले. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडीची शक्यता असल्यामुळे महापालिका निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविण्याचा चंग बांधलेल्या अनेक इच्छुकांना आता अनेक दरवाजे खुले झाले आहेत. विविध राजकीय पक्षांमधील नाराजीचे इनकमिंग व आउटगोइंग मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांपुढे कार्यकर्ते टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. सध्या सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत अनेकजण ताकतीनिशी कामाला लागले आहेत. तसेच जमेल तसे पक्षश्रेष्ठीवर दबाव टाकीत आहेत. एकाच जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याने तिकीट देताना कोणी दुखावला जाणार नाही, याची काळजी नेत्यांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा बंडखोरीचा पक्षांना सामना करावा लागणार आहे. सध्या भाजप व शिवसेना या पक्षांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आपलाच नंबर लागणार असे म्हणत अनेकांनी तयारी सुरु केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडीची शक्यता जवळजवळ संपुष्टात येत असल्याने या पक्षातील इच्छुक आनंदित झाले आहेत. पक्षात आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष सावध भूमिका घेत आहेत. सर्वच राजकीय पक्ष तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत. तसा तगडा उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असल्यास त्याला पक्षात घेण्यासाठी गळ टाकला जात आहे. (वार्ताहर)