शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गाचा वापर करा

By रोशन मोरे | Updated: September 22, 2023 17:50 IST

याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिले आहेत....

पिंपरी : गणेशोत्सव उत्साहात बुधवारी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. दरम्यान, विसर्जनाच्या वेळी मिरवणुका निघाल्याने वाहतूक कोंडी होते. त्यासाठी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिले आहेत.

सांगवी वाहतूक विभाग बदल-सांगवी वाहतूक विभागांतर्गत सोमवारी (दि. २५) दुपारी चार ते रात्री १२ या कालावधीत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

- कृष्णा चौकाकडून फेमस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहतूक पाण्याची टाकी जुनी सांगवी महात्मा फुले पुलाकडून इच्छितस्थळी जातील.

- माहेश्वरी चौकाकडून फेमस चौकाकडे माकण रुग्णालय चौक जुनी सांगवीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.

पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहतूक बँक ऑफ महाराष्ट्र जुनी सांगवीमार्गे औंध किंवा पाण्याची जुनी टाकी सांगवीमार्गे महात्मा फुले पुलावरून इच्छित स्थळी जातील.- कृष्णा चौकाकडून साई चौक ते माहेश्वरी चौककडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहतूक काटे पूरम चौकाकडून डावीकडे वळून मयूरनगरी-एम के हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म -बा. रा. घोलप- महात्मा फुले पुलावरून इच्छितस्थळी जातील.

- कृष्णा चौकाडून क्रांती चौक\ फेमस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी मार्ग - काटे पूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा. रा. घोलप-महात्मा फुले पुलावरून इच्छितस्थळी जातील.- कृष्णा चौकाकडून साई चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी.पर्यायी मार्ग - काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा. रा. घोलप-महात्मा फुले पूलमार्गे.- साई चौक तसेच कृष्णा चौकाकडून जुनी सांगवी पाण्याच्या टाकीकडे जाण्यास वाहनांना बंदी.

पर्यायी मार्ग- बा. रा. घोलप-ढोरे फार्म-एमके हॉटेल-मयूरनगरी-काटे पूरम चौकमार्गे वाहनचालक इच्छितस्थळी जातील.

- पाण्याची टाकी जुनी सांगवी ते बँक ऑफ महाराष्ट्र चौक तसेच शितोळे पेट्रोल पंपाकडे जाण्यास बंदी.

पर्यायी मार्ग - साई चौकातून पाण्याची टाकी जुनी सांगवी पोलिस चौकीजवळून महात्मा फुले पुलाकडून औंध मार्गे.                                                                                                चिंचवड वाहतूक विभाग वाहतुकीत बदल

चिंचवड वाहतूक विभाग-

चिंचवड वाहतूक विभागांतर्गत गुरुवारी (दि.२८) दुपारी तीन ते मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.- अहिंसा चौक ते चाफेकर चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीला बंदीपर्यायी मार्ग - एसकेएफ चौकातून खंडोबा माळकडून मुंबई-पुणे महामार्गाने इच्छित स्थळी जातील.- दळवीनगर पुलाकडून चाफेकर चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदीपर्यायी मार्ग- एसकेएफ चौकाकडून बिजलीनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.- वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून चाफेकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना बंदी.पर्यायी मार्ग : वाल्हेकरवाडी जुना जकात नाका डावीकडे वळून जैन शाळेपासून बिजलीनगर अथवा एसके एक मार्गे खंडोबामाळ मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.- लिंकरोडवरून चाफेकर चौकातील पीएमटी बसस्टॉप येथून चाफेकर चौकात जाण्यास वाहनांना प्रवेश- पर्यायी मार्ग : लिंकरोडने येणारे वाहनचालक डावीकडे वळून काळेवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.- भोई आळी तसेच चिंचवड चौकी येथून चाफेकर चौकात जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंदी.- पर्यायी मार्ग : केशवनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.- चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी रिव्हर व्हयु चौकाकडे जाण्यास बंदी.पर्यायी मार्ग : चिंचवडे फार्म वाल्हेकरवाडी लंडनब्रिज रावेत मार्गे इच्छित स्थळी जातील.-अहिंसा चौक व रिव्हर व्हयु चौकाकडून चाफेकर उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी- पर्यायी मार्ग : रिव्हर व्ह्यू चौककडून वाल्हेकरवाडी मार्गे इच्छित स्थळी व अहिंसा चौक ते महावीर चौक किंवा एसकेएफ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड