पिंपरी : गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात काही तात्पुरते बदल केले असून, पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. तसेच पिंपरीत साई चौक, क्रोमा शोरूम आणि भाजी मंडई या ठिकाणी वाहनतळ सुविधा उपलब्ध केल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.मिरवणुकावेळी पिंपरी पुलावरून शगून चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यास पिंपरी पुलावरून उजवीकडे वळून भाटनगरमार्गे चिंचवडकडे असा पर्यायी मार्ग खुला ठेवण्यात येणार आहे. काळेवाडी पुलावरून डिलक्स चौक, कराची चौकाकडून येणारी वाहने यासाठी रस्ता बंद राहील. तर काळेवाडी स्मशनभूमी चौकातून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलॉर्ड चौकाकडे वळवून डेअरी फार्म मार्गे मुंबई-पुणे महामार्गाने पर्यायी व्यवस्था आहे.>पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे जाणारा मार्ग बंद राहील. तर पिंपरी सेवा रस्त्याने पर्यायी मार्ग खुला केला आहे. मुख्य मिरवणुकीवेळी पिंपरी चौकातून येणारी वाहने पिंपरी पुलावरून शगून चौकाकडे जाणारी वाहने शगून चौकाकडे न जाता पिपंरी पुलावरून भाटनगरमार्गे चिंचवडकडे पाठवली जाणार आहेत.काळेवाडी पुलावरून येणारी वाहने डिलक्स चौक, कराची चौकाकडे न जाता स्मशानभूमी चौकातून उजवीकडे वळून जमतानी चौक, गेलॉर्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म मार्गे पुणे-मुंबई महामार्गाकडे पाठविण्याचा पर्यायी मार्ग खुला केला आहे. कॅम्पात गर्दी वाढल्यास नाशिक फाटा, निगडीकडून येणारी वाहने पिंपरी चौकातून गोकुळ हॉटेलकडे न सोडता सेवा रस्त्याने पाठविण्याची सोय केली आहे.
गणेश विसर्जनादिवशी वाहतुकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:28 AM