शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

चापेकर स्मृती संग्रहालय; तीस शिल्पांतून उलगडणार स्वातंत्र्य लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 3:20 AM

महापालिका व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

पिंपरी : महापालिका व क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यातून देशभरातील भारतीय संस्कृती, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारे दोन हजार वर्षातील घटना आणि घडामोडींवर चिरंतन स्मृती जपणारे हे ६ मजली राष्ट्रीय संग्रहालय उभारणार आहे.संग्रहालयाच्या तिसऱ्या मजल्यावर प्रबोधन पर्वाचा इतिहास सचित्र दाखविण्यात येईल़ यात राजा राममोहन राय यांच्यापासून महात्मा फुले, राजर्षी शाहूमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामस्वामी नायडर या सर्व प्रबोधन चळवळींचा इतिहास, त्याबरोबर स्वामी परमहंस, विवेकानंद, योगी अरविंद यांच्याबरोबर महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल या सर्व चळवळींचा चरित्र इतिहास ठेवण्यात येईल.संग्रहालयाच्या चौथ्या मजल्यावर सर्व विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय समाज विज्ञान संशोधन विकास संस्था यांच्या मार्फत संपूर्ण देशभरातील क्रांतिकारकांची जन्मठिकाणे, स्मृतिस्थळे, गड, किल्ले या ऐतिहासिक ठिकाणांचे संकलन, इतिहास या ठिकाणी असे उपक्रम करण्यासंबंधी निवासी कार्यकर्त्यांचे अभ्यास केंद्र, ऐतिहासिक ग्रंथालय होणार आहे.संग्रहालयाच्या पाचवा मजल्यावर ३५० आसन क्षमतेचे सभागृह असणार आहे. सहावा मजल्यावर स्मारक समिती अन्य उपक्रम, रेकॉर्ड, रेकॉर्डिंग रूम, बैठक असणार आहे.संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर ३० दगडी शिल्पांचा आकार ८ फूट बाय ६ फूट असतील. त्यामध्ये भगवान तथागत गौतम बुद्ध, महावीर, बसवेश्वर यांनी समतेचा संदेश दिला आहे. यावर आधारित ३ शिल्पे असतील, आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त यांचे शिल्प असेल़ स्मारकाच्या मधोमध ४ शिल्पांमध्ये शिवचरित्र साकारले जाईल. उर्वरित भागात थोरले बाजीराव पेशवे, उमाजी नाईक, १८५७ स्वातंत्र्यसमर, लहुजी आणि वासुदेव बळवंत फडके ते सुभाषचंद्र बोस यांचे महानिर्वाणपर्यंत इ. प्रसंग शिल्पांकित करण्यात येतील.दुसरा मजल्यावर भारतातील सर्व क्रांतिकारकांचा सचित्र इतिहास संकलित केला जाईल़ त्यामध्ये वनवासी क्रांतिकारक, भटके विमुक्तातील क्रांतिकारक, महिला क्रांतिकारक, क्रांतिकारकांची असे राज्यवार दालणे असतील. याच भागत एका दालनात भारतातील संतांचे कार्य सचित्रपणे दाखविण्यात येईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड