पिंपरी : महिलेचा सतत घरापर्यंत पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राहुल प्रकाश गायकवाड (वय २७, रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी), असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाडने महिलेचा सतत पाठलाग केला. तसेच रविवारी फिर्यादीच्या घराचा दरवाजा वाजवला. त्या घराबाहेर आल्या असता आरोपीने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच शरीर सुखाची मागणी करून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नाली पालांडे तपास करीत आहेत.