पिंपरी : घरातील सामान दिलेल्या पत्त्यावर न पोहोचवता तसेच ग्राहकाकडून सामान पोहोच करण्यासाठी पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना निगडी पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आॅल इंडिया कॅरिअर पॅकर्स अॅण्ड मुव्हर्स नावाने फसवणूक केल्याचे तपासात सिद्ध झाले.रॉबिन रामचंदर सिवाच (वय १९) अनुज जयभगवान कौशिक (वय २२, दोघेही रा. ट्रान्सपोर्टनगरी, निगडी, मूळ रा. हरियाणा), अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संतोष जितेंद्र सिंह (वय-३५, रा. वाघोली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष सिंह यांच्या घरातील सामान बिकानेर येथे पाठवायचे होते. त्यासाठी त्यांनी जस्ट डायल व सुलेखा डॉट कॉमवरून ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्यांची माहिती घेऊन तशी माहिती या साईटवरून देण्यात आली. पंधरा दिवसांनी संतोष सिंह यांना रॉबिन सिवाच याने फोन करून आॅल इंडिया कॅरिअर पॅकर्स अॅण्ड मुव्हर्स ट्रान्सपोर्ट कंपनीतून बोलत असल्याचे सांगून फसवणूक केली. (प्रतिनिधी)- रॉबिनचा साथीदार अनुज कौशिक याने भाडेबरोबर असल्याचे सांगून त्यांना एसबीआय बँकेचा नंबर देऊन पैसे भरण्यास सांगितले. परंतु, त्यांनी पैसे भरण्यास नकार दिल्याने त्यांना निगडीतील कार्यालयात बोलावले. बिलावर असलेल्या पत्त्यावर गेले असता या ठिकाणी संबंधित पॅकर्स आणि मुव्हर्सचे कार्यालय नसल्याचे समजले.
पॅकर्स अॅण्ड मुव्हर्सच्या नावाखाली फसवणूक
By admin | Published: April 15, 2017 3:51 AM