शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात दाखल; सांगवीत पुरग्रस्तांनी शिंदेंसमोर वाचला तक्रारींचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 2:16 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले आहे

पुणे : पुणे  पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे. त्यामुळे पुण्यातील धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी खबरदारी म्हणून धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या भागात पूरपरिस्थिती निर्माण होतीये. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. परंतु या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुण्यातील या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि पुरग्रस्तांशी चर्चा कारण्यासाठी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुणे दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवड मधील सांगवी भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळेत पुरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडल्या आहेत. त्यावेळी शिंदे यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे.  

पिंपरीत अतिवृष्टीमुळे पवना धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीवरील  घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. या स्थळांची पाहणी करून धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या सुमारे १ हजार  नागरिकांना रविवारी महापालिकेच्या वतीने निवारा केंद्रांमध्ये तसेच नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित केले आहे. 

असा असणार दौरा 

आज दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे पुणे विमानतळ येथे आगमन झाले आहे. आता ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळा जुनी सांगवी येथे पुरग्रस्त भागाची पाहणी आणि पुरग्रस्तांशी चर्चा करण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. त्यानंतर शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, पीएमसी कॉलनी वाकडेवाडी या भागात भेट देणार आहेत. सिंहगड रोड भागात मागील आठवड्यात पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे नुकसान झाले होते. त्या भागातील एकता नगरी येथे नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुणे विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.   

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीRainपाऊसHomeसुंदर गृहनियोजनFamilyपरिवारenvironmentपर्यावरणNatureनिसर्ग