पिंपरी : महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. उमेदवारी अर्ज भरून माध्यमांशी न बोलताच निघून गेले. प्राधिकरणाच्या बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाडीतून कार्यकर्त्यांना अभिवादन केले
आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढण्यात आली. या शक्तिप्रदर्शन रॅलीची सुरुवात आकुर्डी येथील ग्रामदैवत खंडोबाच्या दर्शनाने रॅली सुरू झाली. ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गजरात रॅली सुरू झाली. यावेळी महायुतीच्या घटकपक्षातील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थिती दाखवली. दुपारी बाराच्या सुमारास बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पीएमआरडीएच्या कार्यालयात दाखल झाले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रवीण दरेकर, आमदार सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे, माजी मंत्री बाळा भेगडे आदी सहभागी झाले आहेत. सव्वा बाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा प्राधिकरणाच्या बाहेर आला. त्यावेळी काही क्षण थांबून मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले. मात्र माध्यमांशी न बोलताच निघून गेले.१०० मीटरच्या आत कार्यकर्त्यांची गर्दी
प्राधिकरणातील मावळ लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात १०० मीटरच्या आत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमले होते. जय श्रीराम च्या घोषणा देण्यात येत होत्या.
सुरक्षेचे नियोजन बिघडले
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये १०० मीटरच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मात्र सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेले त्यांना अडवण्यात पोलिसांना अपयश आले. त्यामुळे शंभर मीटरच्या आत हजारो कार्यकर्ते एकत्रित झाले होते व घोषणा देत होते.