पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे औपचारिक उदघाटन बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तालयाच्या इमारतीची पाहणी केली. चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथे आयुक्तालयाची इमारत असून कोनशिलेचे आनावरण करुन या आयुक्तालयाचे उदघाटन झाले. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधब्व, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुण्याचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन आदी उपस्थित होते. उदघाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण कक्ष, दूरध्वनी कक्ष, बिनतारी संदेश विभाग, प्रशासकीय विभागाची पाहणी केली. यानंतर आयुक्तांच्या दालनात काहीवेळ चर्चा झाली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 8:41 PM