शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

बालिकांवर अत्याचाराचे सत्र, कुटुंबातही मुलींना वाटत नाही सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 12:57 AM

उद्योगनगरीत एकाच दिवशी दोन घटना : शेजारी, निकटवर्तीयांच्या वासनांची शिकार

पिंपरी : कासारसाई येथे मजुरांच्या कुटुंबातील दोन मुलींवर त्याच परिसरात राहणाऱ्या नराधमांनी अत्याचार केला. त्यात एका मुलीचा जीव गेला. ही संतापजनक घटना ताजी असताना, चिंचवड आणि निगडी पोलिसांकडे बुधवारी एकाच दिवशी दोन घटना उघडकीस आल्या आहेत. कधी घरातील, नात्यातील वासनांध व्यक्ती, तर कधी शेजाºयांच्या अत्याचाराला बळी पडणाºयांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या महिन्याभरात उद्योगनगरीत चार ते पाच घटना घडल्या आहेत. हे सत्र थांबलेले नसून, चिंचवडमध्ये बुधवारी एका दिवशी दोन घटना उघडकीस आल्या.

तडीपारीच्या कारवाईचा भंग करून शहरात आलेल्या उच्चप्पा मंगळूर या गुंडाने भूत असल्याची भीती दाखवत अवघ्या चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केला. घराबाहेर खेळणाºया मुलीही सुरक्षित नाहीत, हे मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेतून अधोरेखित झाले आहे. वर्षभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना अधिक प्रमाणात घडू लागल्या आहेत. १५ दिवसांपूर्वी एका आयटी अभियंत्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. काही कालावधी उलटला नाही तोच, याच हद्दीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. दगड कापण्याचे यंत्र हवे असल्याचा बहाणा करून एका तरुणाने पाहुण्या आलेल्या अल्पवयीन मुलीला जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना भरदिवसा पवारनगर, थेरगाव येथे घडली होती. वाकडमध्ये दीड महिन्यापूर्वी आरोपीने घरात शिरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीच्या घराचा दरवाजा ठोठावला. मुलीच्या आईने दरवाजा उघडला. आरोपीने तिच्या आईला ढकलून अल्पवयीन मुलीवर आरोपीने अतिप्रसंग केला.कुटुंबातही मुलींना वाटत नाही सुरक्षितजन्मदात्या पित्यानेच पोटच्या अल्पवयीन कर्णबधिर मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या नराधम पित्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. पीडित मुलीची आई घरकाम करण्यासाठी पहाटे घरातून बाहेर पडत असे. दिवसभर घरात कोणी नसल्याने गैरफायदा उठवीत आरोपीने १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केला आहे. सलग सात-आठ महिने सुरू असलेले पित्याचे गैरकृत्य उघडकीस आले. बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र कधी रोखले जाणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPuneपुणे