पिंपरी : येथील लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी काही भाज्यांचे दर वाढले होते, तर काही भाज्यांचे भाव मागील आठवड्याप्रमाणे स्थिर होते. गणेशोत्सवामुळे फळांनाही चांगली मागणी होती. मिरची, वाटाणा, शेवगा, राजमा या भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाव वाढले आहेत. वाटाण्याचे भाव शंभरपर्यंत पोहचले आहेत, तर मिरचीने पन्नाशी गाठली आहे. राजमा व पावटाही शंभरपर्यंत पोहचला आहे. चांगल्या पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. परिणामी आवक वाढली आहे. त्याचा परिणाम पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याप्रमाणेच स्थिर होते. मेथी १५ ते २० रुपयांनी विकली जात होती.गणेशोत्सवामुळे फळांना मागणी वाढली आहे. गौरीपूजनामुळे फळांना बाजारामध्ये चांगली मागणी होती. ड्रॅगन फ्रुट बाजारामध्ये उपलब्ध नसल्याने त्याचे भाव पाचशे रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्याचप्रमाणे पेरू, पपई व सीताफळ यांची आवक वाढली आहे. आवक वाढली असली, तरी फळांना मागणी असल्याने फळबाजारामध्ये तेजी पाहायला मिळाली. बाजारामध्ये नवीन आंबा दाखल झाला असून, ५०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.फळभाज्यांचे किरकोळ विक्रीचे दर (प्रतिकिलो) पुढीलप्रमाणे :बटाटे : २० ते २२, कांदे : २० ते २२, टोमॅटो : १० ते १२, गवार : ४० ते ५०, दोडका : ४०, घोसाळी : ४०, लसूण : ६०, आले : ४०, भेंडी : ३० ते ४०, वांगी : २५ ते ३०, कोबी : २०, फ्लॉवर : ४०, शेवगा : ५० ते ६०, हिरवी मिरची : ५०, शिमला मिरची : ४०, पडवळ : २०, दुधी भोपळा : २५ ते ३०, लाल भोपळा : २०, काकडी : २०, चवळी : ३५ ते ४०, काळा घेवडा : ७०, तोंडली : ४०, गाजर : ३०, वाल : २५ ते ३०, राजमा : ४० ते ५०, मटार : ८० ते १००, कारली : ४०, पावटा : ५०, श्रावणी घेवडा : २५ ते ३० , लिंबू : ४० ते ५० (शेकडा).पालेभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे:कोथिंबीर : १० ते १२, मेथी : १५ ते २०, शेपू : १०, पालक : ८ ते १० , मुळा : १० , कांदापात : १५, तांदुळजा : १०, पुदिना : ५.फळांचे भाव पुढीलप्रमाणे :सफरचंद : १०० आंबा : ५००, पेरू : ८० ते १००, सीताफळ : १०० ते १२०, पपई : ४०, डाळींब : ८० ते १००, मोसंबी : ८० ते १००, संत्री : ८० ते १०० (परदेशी) , किवी : १००(५ नग) , ड्रॅगन फ्रुट : ५०० , पिअर : १२०, १८० (परदेशी).
मिरची, वाटाणा, राजमा महाग; गणेशोत्सवामुळे फळांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 2:42 AM