शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चिंचवडमध्ये भाजपाला २ जागा

By admin | Published: February 25, 2017 2:27 AM

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवडमध्ये फोडला होता. याच वेळी त्यांनी शहरात भाजपाची सत्ता येईल

चिंचवड : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवडमध्ये फोडला होता. याच वेळी त्यांनी शहरात भाजपाची सत्ता येईल, असा दावा केली होता. बहुतांश विद्यमान नगरसेवकांना विविध पक्षांतून उमेदवारी मिळाली होती. मात्र भाजपाचा एकही नगरसेवक नसणाऱ्या चिंचवड गावातील प्रभाग क्रमांक १८मध्ये यंदाच्या निवडणुकीत दोन नगरसेवक मिळाले आहेत. या प्रभागात अ गटातून सुरेश भोईर व ड गटातून राजेंद्र गावडे विजयी झाले आहेत.राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक संदीप चिंचवडे यांचा ९५१३ मतांनी पराभव केला आहे. चिंचवडे यांना ६३९२ मते मिळाली. याच प्रभागात भाजपाने कट्टर समर्थकांना डावलून भोईर यांना उमेदवारी दिली होती.यामुळे प्रबळ दावेदार समजले जाणारे मोरेश्वर शेडगे यांना पक्षाने नाकारले होते.माजी नगरसेवक शरद बाराहाते यांच्या सह प्रदीप सायकरही इच्छुक होते. आमदार लक्ष्मण जगताप यांना मानणारा मोठा गट या प्रभागात आहे. अंतर्गत गटबाजी होईल अशी चर्चा सुरु होती.तिकीट वाटपामुळे भाजपाचा नाराज गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र या घडामोडीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने सायकर यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली. मात्र ते ३७९१ मते घेत तिसऱ्या स्थानावर राहिले.काँग्रेसचे प्रदीप पवार व मनसेचे दहिफळे सर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत.यामुळे १५९०५ मते मिळवत भोईर यांनी एकतर्फी विजय मिळविला. ब गटातून राष्ट्रवादीच्या माजी महापौर अपर्णा डोके यांनी १२२७० मते मिळविली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या माधुरी गुरव यांना ९४९० मते मिळविली, तर शिवसेनेच्या निकिता चिंचवडे यांना ६२८१ मते मिळाली. या गटात अन्य पक्षांचे व अपक्ष उमेदवार उभे नसल्याने तिरंगी लढत होणार हे स्पष्ट होते. या लढतीत डोके यांनी २७८० मतांनी विजय मिळविला. क गटातून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका पुन्हा विजयी झाल्या. त्यांना १३४६० मते मिळाली. भाजपाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मयूरी कुलकर्णी (बंब) यांनी ९९१३ मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिल्या.या गटात राष्ट्रवादीच्या सरोज माने यांना फारसा प्रभाव टाकता आला नाही.त्यांना २८५७ मते मिळाली.तर काँग्रेसच्या भाग्यश्री भोईर यांना १२१० मते मिळाली.या गटात क्रॉस मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अश्विनी चिंचवडे यांच्या कामामुळे मतदारांनी त्यांना पुन्हा संधी दिल्याचे समोर आले आहे. ड गटातून भाजपाचे राजेंद्र गावडे विजयी झाले. या गटात काटे की टक्कर होईल असा सर्वांचा अंदाज होता. गत निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर विजयी झालेल्या अनंत कोराळे यांनी या वेळी मनसेला राम राम करत शिवसेनेची उमेदवारी मिळविली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे यांचा मुलगा विजय यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या लढाईत राजेंद्र गावडे हे विजयी झाले. त्यांनी १०५३३ मते घेतली. कोराळे यांना ८५६८ मते मिळाली. अपक्ष उमेदवार राजेश आरसूळ १०१६ मते, मनसेचे रवि गायकवाड ७१०, तर काँग्रेसचे सचिन निंबाळकर यांना ४६१ मते मिळाली. भाजपाचे राजेंद्र गावडे १९६५ मतांनी विजयी झाले.(वार्ताहर)