अहिर यांची भेट, उद्धव ठाकरेंचा फोन; तरीही राहूल कलाटेंची माघार नाहीच, तिरुंगी लढत होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 04:12 PM2023-02-10T16:12:37+5:302023-02-10T16:14:53+5:30

राहूल कलाटेंनी अर्ज माघारी न घेतल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे...

Chinchwad By-Election | 28 people in the field for Chinchwad Assembly! Two machines will be required | अहिर यांची भेट, उद्धव ठाकरेंचा फोन; तरीही राहूल कलाटेंची माघार नाहीच, तिरुंगी लढत होणार!

अहिर यांची भेट, उद्धव ठाकरेंचा फोन; तरीही राहूल कलाटेंची माघार नाहीच, तिरुंगी लढत होणार!

googlenewsNext

पिंपरी :चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत ५ जणांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता २८ जण रिंगणात असणार असून दोन इव्हीएम मशीन लागणार आहेत. राहूल कलाटेंनी अर्ज माघारी न घेतल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे. कलाटे यांना अर्ज माघारी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोनही केला होता. तसेच शिवसेनेचे सचिन अहिरही सकाळपासून चिंचवडमध्ये ठाण मांडून होते. 

चिंचवड  विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अर्ज भरण्याकरिता ३१ जानेवारीपासून सुरूवात झाली होती. ७ फेब्रुवारीपर्यंत ४० उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले. बुधवारी अर्जांची छाननी केल्यानंतर ४० उमेदवारांपैकी ७ उमेदवारांचे अर्ज अपात्र झाले आहे. त्यानंतर ३३ उमेदवार शिल्लक राहिले. अर्ज माघारीची मुदत शुक्रवार दुपारी तीन पर्यंत होती. गुरूवारी अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी पाच जणांनी अर्ज माघारी घेतले.

आज अर्ज माघे घेतलेेले उमेदवार खालीलप्रमाणे..
१) राजेंद्र मारूती काटे (अपक्ष)
२) भाऊसाहेब रामचंद्र अडागळे 
 (अपक्ष)
३) प्रविण अशोक कदम (संभाजी ब्रिगेड)
४) मनिषा मनोहर कारंडे
 (अपक्ष)
५) रविंद्र पारधे  (अपक्ष)

निवडणूक चिन्ह घेण्यासाठी गर्दी

 उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मदत संपल्यानंतर निवडणूक चिन्ह घेण्यासाठी थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधी गर्दी झाली होती.

Web Title: Chinchwad By-Election | 28 people in the field for Chinchwad Assembly! Two machines will be required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.