पिंपरी : चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीचा निकाल गुरूवारी आहे. त्यापूर्वीच भाजपा आणि महाविकास आघाडीने विजयाचे फ्लेक्स, अभिनंदनाचे फ्लेक्स लावले आहेत. चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीची आचारसंहितामध्ये जानेवारी महिन्यात जारी झाली. त्यानंतर चिंचवड विधानसभेची उमेदवारी अर्ज भरणे, माघारी, प्रचार आणि मतदान यासाठी विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार कार्यकर्ते कार्यमग्न होते. रविवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आता निकालाचे आडाखे बांधत असताना उमदेवार आणि कार्यकर्ते दिसत आहेत. तर दुसरीकडे निकालाची उत्कंठा सर्वांना लागली आहे.
तर दुसरीकडे तसेच गुरूवारी होणाऱ्या मतमोजणीच्या नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच गुरुवारी निकाल असला तरी दोन दिवसांपासून दावे आणि प्रतिदावे होऊ लागले आहे. विविध एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्याने फ्लेक्स आणि सोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे. निकालापूर्वीच विजयी भव, जनतेच्या मनातील आमदार असे स्टेटस व्हॉट्सअॅपवर आणि इंस्टाग्रामवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे झळकत आहेत. तर आमदार वहिनीसाहेब असे फ्लेक्स पिंपरी परिसरात लावले आहेत.