शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Chinchwad By Election | चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी मतदान साहित्याचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 3:30 PM

प्रशिक्षणानंतर मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे केंद्रनिहाय वाटप करण्यात आले...

पुणे :चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण आणि निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत मतदान कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.

थेरगाव येथील स्व.शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे ३ हजार प्रशिक्षणार्थींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त विठ्ठल जोशी यांनी तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत तसेच साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहीत नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. 

प्रशिक्षणानंतर मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे केंद्रनिहाय वाटप करण्यात आले.  मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य जमा करून घेतले जाणार असून स्वीकृतीचे काम थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. साहित्य वाटप करण्याकरीता १११ कर्मचारी तर स्वीकृतीसाठी १४८ कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले आहे. 

साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून २६ टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप कामकाजाला सुरुवात केली. नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राचे साहित्य मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची नोंद साहित्य वाटप नोंदवहीत घेण्यात आली. मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्राध्यक्ष आणि सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य तसेच मतदान प्रक्रीयेविषयीचे विविध पाकीटे आणि लिफाफे आदी साहित्य सुपूर्द करण्यात आले.

 मतदान साहित्य ताब्यात घेतल्यानंतर नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये पीएमपीएमएलच्या १०२ बसेस, ८ मिनीबस आणि १२ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतुक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात लावण्यात आला होता. या मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी ५१ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यासाठी ३ हजार ७०७ पोलीस कर्मचारी व ७२५ अधिकाऱ्यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पोटनिवडणुक मतदानाच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली असून ही निवडणूक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता या मतदार संघातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

टपाली मतदानाची सुविधानिवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी २४८ कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठी फॉर्म वाटप करण्यात आले होते. त्यांच्यासाठी साहित्य वितरण ठिकाणी टपाली मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान या कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठीचे अर्ज देण्यात आले होते. त्यानुसार काही कर्मचाऱ्यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.

सखी मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्रचिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी यावेळी थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयांमध्ये १९५ क्रमांकाचे मतदान केंद्र 'सखी मतदान केंद्र' म्हणून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्या केंद्राची विशेष रचना तयार करण्यात आली आहे. रावेत येथील बबनराव भोंडवे शाळेमधील २३ क्रमांकाचे केंद्र तसेच वाकड येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ३९५ आणि ४०५ क्रमांकाचे केंद्र आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग स्टेशन) म्हणून तयार करण्यात आले आहे.

टॅग्स :chinchwad-acचिंचवडElectionनिवडणूक