पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील पोलीस वसाहतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मैलासांडपाणी निचरा होण्याची योग्य प्रकारची सुविधा नाही. शासकीय वसाहतींच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पाटबंधारे (पीडब्ल्यूडी ) विभागाकडे असून, त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. शिवाय महापालिकेच्या आरोग्य विभागानेही कानाडोळा केल्याने पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.या वसाहतीत राहणा-या पोलीस कुटुंबीयांच्या घरातील व्यक्ती आजारी आहेत. पाच जणांना डेंगीची लागण झाली आहे. सर्दी, पडसे,खोकला असे आजार येथे राहणाºया पोलीस कर्मचाºयांसह त्यांच्या कुटुंबीयांना वारंवार होत आहेत.नियमितपणे या भागात साफसफाई होत नाही. ज्या ठिकाणी पोलीस राहतात, त्या परिसराला घाणीचा विळखा बसला आहे. सर्वत्र दलदल, दुर्गंधी पसरली आहे. अशा घाणीच्या साम्राज्यात पोलिसांच्या कुटुंबीयांना दिवस कंठण्याची वेळ आली आहे. क्षीरसागर, धनवे आणि राठोड या कुटुंबातील सदस्य आजारी पडले आहेत.कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी म्हणून पोलीस सेवेत २४ तास कर्तव्य बजावणाºया पोलिसांची, त्यांच्या कुटुंबीयांची एक प्रकारे अवहेलना होत आहे. दिवसभर काम केल्यावर घरी गेल्यानंतरही पोलीस कर्मचाºयांना शांतपणे विश्रांती घेता येत नाही. कुटुंबातील कोणी तरी सदस्य आजारी असतोच; त्यामुळे वारंवार दवाखान्यात फेºया माराव्या लागतात.ऐन दिवाळीच्या सण, उत्सव काळात या वसाहतीतील पोलिसांच्या कुटुंबातील अनेक सदस्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.शासकीय वसाहती : प्रशासनाकडून दुर्लक्षितपोलीस खात्यात काम करताना दिवसभर विविध प्रकारच्या कामाचा ताण, सायंकाळी घरी गेल्यानंतरही विश्रांती घेता येत नाही. अशी परिस्थिती रोजच्या अस्वच्छतेच्या समस्येने हैराण झालेले कुटुंबीय यामुळे पोलीस वसाहतीत राहणारे कर्मचारी अक्षरश: सरकारी निवासस्थान नको रे बाबा, असे म्हणू लागले आहेत. आरोग्य विभाग तसेच ज्यांच्याकडे देखभालदुरुस्तीची जबाबदारी आहे त्यांनी लक्ष घालावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
चिंचवड पोलीस वसाहत आरोग्य समस्येने हैराण, पोलिसांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 2:26 AM