लोकमत न्यूज नेटवर्करावेत : चिंचवडेनगरमध्ये एक मनोरुग्ण उच्च दाबाच्या विजेच्या खांबावर चढून बसला होता. या मार्गावरून जाणाºया नागरिकांच्या लक्षात ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली.समीर इन्सान खान (वय २०, रा. चिंचवडेनगर, चिंचवडगाव) असे या तरुणाचे नाव आहे. चिंचवडेनगर येथे रविवारी पहाटे पाच ते सात या कालावधीत समिर हा विजेच्या खांबावर व्यायाम करत होता. त्यामुळे सकाळी नागरिकांना धक्काच बसला. अग्निशमन दलाला माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. तातडीने वीज बंद केली व त्याला उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या तरुणाने उतरण्यास नकार दिला. त्या वेळी तरुणाने वरून जवानांना लाथा मारण्यास सुरुवात केली. खांबाच्या टोकावर चाललेली ही कसरत बघणारे नागरिक आश्चर्यचकित होत होती. तातडीने रुग्णवाहिका बोलविण्यात आली. सव्वा सात ते सव्वा आठ या एक तासाच्या कसरतीनंतर हा तरुण कसाबसा खाली उतरला. कुटुंबीयांनी सांगितले की, समीर हा मनोरुग्ण आहे. या आधीही त्याने असे धाडसी कृत्य केली आहेत. खाली उतरल्यानंतरही समीर रुग्णवाहिकेत बसण्यास तयार नव्हता. जवानांनी त्याला स्ट्रेचरवर बांधले व पुढील उपचारासाठी वायसीएम रुगणालयात पाठविले. अग्निशमन दलाचे जवान अशोक कानडे, शंकर पाटील, अमोल खंडारे, मुकेश बर्वे व भूषण एवले यांनी ही कार्यवाही केली.
चिंचवडला जीवघेणा थरार, मनोरुग्ण चढला विद्युत खांबावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 3:20 AM