पिंपरी- चिंचवड: माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हे कृतीतून सत्यात उतरविण्याचा वसा चिंचवडकरांनी घेतला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील अस्थिरतेला मदतीचा हात देण्यासाठी समस्त चिंचवड कर पुढे सरसावले आहेत.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सामाजिक उपक्रम राबविणारे चिंचवडकर आपल्या कायार्तून आगळा वेगळा ठसा उमटवित आहेत.रक्तदानाच्या शिबिरातून ३६० जणांचे रक्तदान करण्यात आले आहे.शहरातील विविध भागात गोरगरीब, निराधार, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी व गरजवंत नागरिक आपल्या घरापासून वंचित झाले आहेत.या सर्वांना मदतीचा हात म्हणून दिवसातून दोन वेळा भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.लॉक डाऊन सुरू झाल्यावर सुरवातीला २०० जणांचे भोजन चिंचवड गावातील धनेश्वर मंदिरात बनविले जात होते.आता सध्या आठ हजार फूड पॅकेट बनविण्यात येत आहेत.
पिंपरी शहरातील गरजूंना भोजन व्यवस्था करण्यात श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते स्वत:ची व समाजाची सुरक्षितता लक्षता घेऊन शहरातील विविध भागात नागरिकांची भूक भागवत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे.अपर तहसीलदार गीता गायकवाड यांनी श्री काळभैरवनाथ उत्सव समितीला सन्मानपत्र देऊन गौरविले आहे.चिंचवड गावातील कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी या उपक्रमाला सुरवात केली.त्यांचे सामाजिक कार्य पाहून अनेकजण मदतीचा हात देत आहेत.नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे व घरात राहून कोरोनाला हद्दपार करायचे हे धोरण अवलंबले आहे.कोणीही पोटाची भूक भागविण्यासाठी घराबाहेर येऊ नये यासाठी हे कार्यकर्ते घरपोच जेवणाची सेवा देत आहेत. या कार्याला पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालय व चिंचवड पोलिसांचे सहकार्य मिळत आहे.
ज्या गरजूंना जेवणाची अडचण आहे त्यांनी चिंचवड गावातील काळभैरवनाथ उत्सव समितीशी अथवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.