शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चुरस

By admin | Published: March 18, 2017 4:47 AM

महापौर, उपमहापौर, पक्षनेता निवडीनंतर आता स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. स्थायी समिती सभापती चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभेतील कोणाची

पिंपरी : महापौर, उपमहापौर, पक्षनेता निवडीनंतर आता स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता आहे. स्थायी समिती सभापती चिंचवड, भोसरी की पिंपरी विधानसभेतील कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिंचवड विधानसभेलाच स्थायी समिती अध्यक्षपद मिळणार असल्याचा दावा भाजपाचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी शत्रुघ्न काटे, माई ढोरे, आशा शेंडगे व माधवी राजापूरे यांची नावे चर्चेत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. महापालिकेत भाजपाची प्रथमच सत्ता आली आहे. मात्र, पक्षातील नेत्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे आणि जुन्या नव्यांच्या वादामुळे स्थायी समितीसह इतर समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांची निवड रखडली आहे. महापालिकेची निवडणूक शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढली. आता निवडणुकीनंतर भाजपात खासदार अमर साबळे, आमदार जगताप, आमदार महेश लांडगे, अ‍ॅड. सचिन पटवर्धन, माजी महापौर आझम पानसरे असे गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडीत भाजपातील अंतर्गत गटबाजी उफाळून होती. ऐन निवडणुकीत नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांना संधी देण्यात आली. महापौर व उपमहापौर निवडीत चिंचवडमधील भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांना डावलल्याने पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष व सदस्य निवडीत चिंचवडला झुकते माफ देण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)पक्षनेते आणि महापौरांत सवतासुभाभाजपातील जुन्या गटांचे प्रतिनिधी म्हणून पक्षनेते एकनाथ पवार, नवीन गटांचे प्रतिनिधी म्हणून नितीन काळजे यांना संधी दिली. महापौरांनी पहिली बैठक स्वत:च्या अधिकारात घेतली. यापूर्वीचे महापौर पक्षनेते आणि पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांच्यात बैठक होत होती. पक्षनेत्यांनी पदभार स्वीकारताच शासकीय वाहन नाकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापौर, उपमहापौर व अन्य पदाधिकाऱ्यांची अडचण झाली आहे. वरवर पवार आणि काळजे यांच्यात गटबाजी दिसून आली.स्थायी समितीवर संधी देताना पिंपरी, चिंचवड किंवा भोसरी विधानसभा असे न पाहता शहर पातळीवरील विचार करून संधी दिली जाणार आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात झुकते किंवा कोणावर अन्याय करण्याचा उद्देश नाही. स्थायी समिती सभापतीनिवडीनंतरच्या सभेत विषय समित्यांची निवड करण्यात येणार आहे.- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते