चिंचवड: रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या अनाधिकृत दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज चिंचवड गावात कारवाई केली. या कारवाईत भीमनगर भागातील दहा ते बारा दुकाने ,टपऱ्या व पत्राशेड पाडण्यात आले. या कारवाईला स्थानिक नागरिक व व्यावसायिकांनी विरोध केल्याने या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. कै.शहिद अशोक कामठे बस थांब्यासमोरील रस्त्यावर अडथळा दुकानांवर कारवाई करण्यासाठी आज सकाळी पालिकेने सुरवात केली.याप्रसंगी काही व्यावसायिकांनी या कारवाईला विरोध केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याने तणाव निवळला. या कारवाई बाबत पालिका प्रशासनाने येथील व्यावसायिकांना नोटीस बजावल्या होत्या. स्थानिकांनी मात्र ही जागा खाजगी असल्याने संबंधित व्यक्तींशी चर्चा करून कारवाई करायला हवी होती अशी भूमिका घेतल्याने वाद वाढत गेला. कारवाई करताना दुजाभाव होत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्ते करत होते. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. चुकीच्या पद्धतीने कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते करीत होते. ही कारवाई जाणीवपूर्वक केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.जागेबाबत पत्रव्यवहार सुरु असुन जागा खाजगी संस्थेची असल्याने या कारवाई बाबत चर्चा करणे महत्वाचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ जगताप यांनी व्यक्त केले. चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी याठिकाणी उपस्थित राहून मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता.
चिंचवड गावात अनाधिकृत दुकानांवर कारवाई परिसरात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 4:55 PM
रस्त्यावर अडथळा दुकानांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी सकाळी पालिकेने सुरवात केली.याप्रसंगी काही व्यावसायिकांनी या कारवाईला विरोध केला.
ठळक मुद्देखाजगी संस्थेची असल्याने या कारवाई बाबत चर्चा करणे महत्वाचे स्थानिकांचे मत कारवाई ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात