पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराचा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल तयार करण्यात येत आहे. यंदा पहिल्यांदाच या अहवालात शहरातील नागरिकांनी पर्यावरणासंबंधी राबविलेल्या स्तुत्य उपक्रमांचीही दखल घेणार आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात येणार आहे. अहवाल तयार करीत असताना विविध प्रकारची माहिती गोळा करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी केलेल्या पर्यावरणासंबंधी विविध उपक्रमांची माहितीसुद्धा घेण्यात येणार आहे. यासाठी एखाद्याने पर्यावरणसंबंधी उपक्रम राबविला असल्यास या उपक्रमाची माहिती अंदाजे ५०० शब्दांमध्ये तयार करावी. त्यात प्रकल्प किंवा उपक्रमांमुळे पर्यावरणाला होणारा फायदा याची माहिती देण्यात यावी. दोन छायाचित्रे, संकेतस्थळ वा बातमी देण्यात यावी. (प्रतिनिधी)शहरात होणाऱ्या विविध पर्यावरणीय बदलांबद्दल जागरूक असलेले नागरिक, निसर्गाशी निगडित असणाऱ्या संस्था, पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी इको फ्रेंडली वस्तूंचे उत्पादन व वापर करणारे नागरिकसुद्धा आपले मत, अहवाल पाठवू शकतात. शहरातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या माहितीचा अभ्यास करून योग्य ती माहिती शहराच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात समाविष्ट केली जाईल. शहरातील नागरिकांनी व स्वयंसेवी संस्थांनी आपली माहिती पाठवून सहभाग द्यावा.- दिनेश वाघमारे, आयुक्त
पर्यावरण अहवालात घेणार नागरिकांचा सहभाग
By admin | Published: March 30, 2017 2:27 AM