रावेत : घराची खरेदी करताना कर्ज आणि अन्य बाबींसाठी मुद्रांकाची (स्टॅम्प पेपर) गरज असते. पिंपरी-चिंचवडकरांना मात्र मुद्रांकाच्या शोधात शनिवारी वणवण फिरावे लागले. शहरातील अनेक मुद्रांक विक्रेत्यांकडे मागील आठवड्यापासून मुद्रांकांचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच शनिवारी मुद्रांकांचा तुटवडा सर्वत्र होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.
जागेच्या खरेदी विक्रीच्या कागदपत्रांसाठी, कार्यालयीन काम आणि विविध करांरासाठी मुद्रांकांची गरज भासते. त्याचबरोबर विविध योजनांच्या लाभासाठी, महसूल तसेच इतर विभागाशी संबंधित विविध कामांसाठी वेगवेगळी करारनामे, प्रतिज्ञालेख आदींसाठी मुद्रांकांची आवश्यकता भासते. अनेक शासकीय कामांसाठी मुद्रांक महत्त्वाचा ठरतो. त्यात मोठ्या कामांसाठी मोठ्या रकमेचे स्टॅम्पपेपर वापरले जातात. शहरात वेगवेगळ्या पद्धतीचे मोठे व्यवहार होत असल्याने स्टॅम्पपेपरची मागणीही मोठी आहे. त्यातून दिवसाला हजारो रुपयांची उलाढाल होते. यासाठी शासनमान्य अनेक मुद्रांक विक्रेते असून, ते वेगवेगळ्या ठिकाणी मुद्रांक विक्री करताना दिसतात. शनिवारी या विक्रेत्यांकडे १००, ५०० आणि एक हजार रुपयांच्या मुद्रांकांचा तुटवडा होता.जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत पिंपरी-चिंचवड शहरात व ग्रामीण भागात मुद्रांक विक्रेत्यांना पाचशे, एक हजार व शंभर रुपयांचे मुद्रांक दिले जातात. या कार्यालयातून विक्रेते दिवसाला किती मुद्रांक घेऊन जातात, याची नोंद असते. बँकेत चलन भरल्यानंतर गर्व्हन्मेंट रिसिट अकाउंटिंग सिस्टीम या प्रणालीत ही माहिती दिसते. त्यानंतर मुद्रांक विक्रेत्यांना चलन रद्द करून मुद्रांक दिले जातात. एक चलन भरल्यानंतर एक व्यवहार केला जातो. पोलीस बंदोबस्तात कोषागार कार्यालयात मुद्रांक आणले जातात.मोरवाडी न्यायालयातही मुद्रांक तुटवडा४शहर आणि परिसरातील न्यायालयीन कामकाजासाठी मोरवाडी न्यायालयात नागरिकांना चकरा माराव्या लागतात. शनिवारी न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकार आणि वकिलांना मुद्रांकांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले. न्यायालयाबाहेर नोटरी करणाऱ्या वकिलांना मुद्रांकाअभावी काम करणे अवघड झाले होते.४अनेक विक्रेत्यांनी आज मुद्रांक विक्री बंद आहे, असे फलक लावले होते. काही नागरिकांनी पिंपरी येथील एका विक्रेत्याकडे मुद्रांक मिळविण्यासाठी गर्दी केली होती. मुद्रांक मिळविण्यासाठी नागरिकांना रांगेत तासंतास ताटकळावे लागले. एक व्यक्ती एका वेळेस दहा ते बारा मुद्रांक खरेदी करत असल्याने त्याची नोंदणी करताना विक्रेत्याची दमछाक होत होती.मुद्रांकाची जादा दराने विक्रीमुद्रांकाचा सध्या तुटवडा आहे. शंभर रुपयांचा मुद्रांक ११० रुपयांना, ५०० रुपयांचा मुद्रांक ५५० रुपयांना विकण्यात येत होता. जादा दराने विक्री करून विक्रेत्यांनी स्थानिक जनतेला सध्या वेठीस धरले आहे. मात्र मुद्रांक विक्रेत्यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींना मात्र ते सहज दिले जातात. शहरातील सर्व सरकारी कार्यालयांत मुद्रांक मिळत नसल्याने लाभार्थ्यांना नाईलाजाने जादा दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.नवीन वर्षाची सुरवातच आम्हा वकील बांधवांची मुद्रांक तुटवड्याला सामोरे जाऊन झाली आहे. १ जानेवारीपासून विशेषत: ५०० रुपयांच्या मुद्रांकाचा तुटवडा आहे. त्यामुळे मोरवाडी न्यायालयात पक्षकार आणि वकिलांना कामकाज करता आले नाही. अनेक शासकीय कामकाजासाठी नोटरी करणे आवश्यक असते. परंतु मुद्रांकाच्या तुटवड्यामुळे नोटरी करता आली नाही. गेल्या काही दिवसांपासून कामकाजाविना वकिलांना न्यायालयाच्या आवारात थांबावे लागत आहे.- अॅड. योगेश थंबा, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड अॅड. बार असोसिएशनमाझ्या कार्यालयीन कामासाठी मला ५०० रुपयांच्या मुद्रांकाची आवश्यकता होती. शहरातील अनेक विक्रेत्यांकडे सकाळपासून फिरत आहे. परंतु मला शहरात कोठेही मुद्रांक उपलब्ध झाला नाही. पिंपरीत मुद्रांक विक्री चालू आहे, असे समजले. मात्र तेथे तीन तास रांगेत थांबल्यानंतर मला ५० रुपये जादा देऊन ५०० रुपयांचा मुद्रांक मिळाला. - सहदेव भांबुरे, ग्राहक