पिंपरी चिंचवड: चिंचवड मधील एम्पायर इस्टेट येथील पुलाचा आराखडा बदलून तेथे रॅम्प उभारणी करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी वारंवार केला आहे. पालिका प्रशासनाच्या या नियोजनाबाबत स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे व त्या परिसरातील नागरिकांच्या वतीने त्याला कडाडून विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड महापालिका भवनावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. १०० कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या या भागातील उड्डाणपुलाचा त्रास स्थानिक नागरिकांनी सोसला आहे.कामासाठी झालेला विलंब व नियोजनातील बदल यामुळे नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त होते.आता याच पुलाला जोडून रॅम्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, रहिवाशांनी या रॅम्पच्या विरोधात भूमिका घेतली आहे. रॅम्पबाबत न्यायालयात दाद मागितली असल्याने रॅम्पचे काम सध्या बंद करावे, या मागणीसाठी नागरिकांनी एकत्र येत शनिवारी निषेध मोर्चा काढला. या मोर्चात एम्पायर फेडरेशनचे संजय शेवाळे,संतोष पिंगळे,रणजित एडके,राजेश रेगुंठा,हरिष ललवाणी,माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्यासह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. पालिका प्रशासनाने रॅम्प प्रकल्पाबाबत ले-आऊट तयार केला असून या कामाला सुरवात केली आहे.मात्र,यामध्ये अनेक त्रुटी असून काही नियम धाब्यावर बसवत मनमानी पद्धतीचे नियोजन केल्याचा आरोप नागरिकांमार्फत करण्यात आला आहे. पुणे-मुंबई महामार्गाजवळ असणाºया सोसायटीमधून दर वर्षी कोट्यावधी रुपयांचा कर महापालिकेला मिळत आहे. तरीही त्या परिसरातील रहिवाशांच्या अडचणी विचारात न घेता चुकीचे निर्णय घेत असल्याचे सोसायटीचे पदाधिकारी म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाने तोडगा काढणे महत्वाचे आहे.प्रशासनाने या प्रकल्पाविषयी कोणतीही सखोल चर्चा न करता परस्पर निर्णय घेऊन नवीन रॅम्प उभारण्याचे काम करण्याचा घाट घातला आहे. या चुकीच्या निर्णयाला आमचा विरोध असून या कामाविषयी योग्य नियोजन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज आयुक्तांना देण्यात आले.स्थानिक रहिवाशी आता एकजुटीने या रॅम्पला विरोध करण्यासाठी पुढे आले आहेत. दहा हजार रहिवाशी असणाऱ्या सोसायटीला या रॅम्पमुळे अडचणी येणार असून वाहतुक कोंडीची समस्या देखील निर्माण होणार असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या रॅम्प बाबत न्यायालयात दाद मागितली असल्याने हे काम त्वरित बंद करावे. अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. ........
एम्पायर इस्टेट मधील ‘रॅम्प’ ला नागरिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 7:52 PM
१०० कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या या भागातील उड्डाणपुलाचा त्रास स्थानिक नागरिकांनी सोसला आहे.कामासाठी झालेला विलंब व नियोजनातील बदल यामुळे नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त होते.आता याच पुलाला जोडून रॅम्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, रहिवाशांनी या रॅम्पच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
ठळक मुद्देचुकीच्या निर्णयाला आमचा विरोध असून या कामाविषयी योग्य नियोजन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन रॅम्प बाबत न्यायालयात दाद मागितली असल्याने हे काम त्वरित बंद करावे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करणार