पिंपरी : बीएस- ३ मानक ाच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या उत्पादन व विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलपासून बंदी आणल्याने उर्वरित दोन दिवसांत ग्राहकांनी गाड्या खरेदी कराव्यात, म्हणून वाहन कंपन्यांनी पाच हजार ते दीड लाखांपर्यंत घसघशीत सुट दिली. त्यामुळे आज शहरातील दुचाकीसह चारचाकीच्या शोरूममध्ये नागरिकांची झुंबड उडाल्याने शोरूमला जत्रेचे स्वरूप आले होते. बीएस-३ मानक असणाऱ्या गाड्यांमुळे प्रदूषणात होत असल्याने त्यांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश बुधवारी दिल्यामुळे उत्पादित केलेल्या गाड्यांचे नेमके करायचे काय, असा प्रश्न कंपन्यांना पडला. ३१ मार्चपर्यंत या गाड्यांची खरेदी केली जाऊ शकते, ही संधी ओळखून कंपन्यांनी ग्राहकांना दुचाकीसाठी ५ हजार ते २५ हजार, तर चारचाकी वाहनांसाठी दीड लाखापर्यंत सूट देण्यात आली होती. (प्रतिनीधी)बीएस-३ मानकातील नवीन गाड्यांच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी आणली असली ३० आणि ३१ मार्च रोजी सवलतीच्या दरात खरेदी केलेल्या वाहनांचे इनव्हाईस बिल, वाहन विमा अथवा नोंदणीपत्र दाखवून आरटीओमध्ये या वाहनांची नोंदणी होणार आहे. तसेच, या मानकाच्या जुन्या गाड्या वापरता येणार आहेत. शिवाय, या गाड्यांची नोंदणी असल्याने त्यांची खरेदी-विक्रीदेखील करता येईल.
वाहनखरेदीसाठी नागरिकांची झुंबड
By admin | Published: April 01, 2017 2:07 AM