पिंपरी चिंचवड : मातीच्या ढिगाऱ्याखील अडकलेल्या कर्मचाऱ्यांना काढण्यासाठी खड्यात उतरलेल्या जवानाच्या अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने त्याखाली दबून जवानाचा मृत्यू झाला. दापाेडी भागात ही घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहीद झालेल्या विशाल जाधव या जवानाला आज नागरिकांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान उपस्थित हाेते.
काल रात्री 7 च्या सुमारास दापाेडी येथील आई गार्डन जवळ ड्रेनेज लाईनसाठी खाेदण्यात आलेल्या खड्ड्यात एक कामगार पडला. त्याच्या अंगवार माती पडल्याने ताे ढिगाऱ्याखाली दाबला गेला. त्याला वाचविण्यासाठी इतर काही तरुण खड्ड्यात उतरले. यावेळी बघ्यांच्या गर्दीमुळे आणखी माती या खड्ड्यात पडली त्यात इतर तरुणही दाबले गेले. या तरुणांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करुण्यात आले. यावेळी सुरु असलेल्या रेस्क्यु ऑपरेशनच्या दरम्यान विशाल जाधव यांच्या अंगावर देखील मातीचा ढिगारा काेसळला, यात त्यांच्या मृत्यू झाला. तसेच मातीखाली गाडल्या गेलेल्या नागेश कल्याणी जमादार या कामगाराचा देखील दुर्दैवी अंत या घटनेत झाला. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास सर्वांना बाहेर काढल्यानंतर रेस्क्यु ऑपरेशन थांबविण्यात आले.
विशाल जाधव यांना अग्निशमन विभाग संततुकाराम नगर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महापौर उषा ढोरे समवेत आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका सुजाता पालांडे, माई काटे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील उपस्थित होते.