तळेगाव दाभाडे : नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी तळेगाव शहर विकास समितीमध्ये फूट पडली आहे. फुटलेल्या गटाने तळेगाव जनसेवा विकास समितीची स्थापना केली आहे. नवीन समिती भाजपशी संलग्न होऊन महायुती करण्याची शक्यता आहे. सध्या तळेगाव नगर परिषदेत राष्ट्रवादी व काँग्रेस प्रणित शहर विकास समितीची सत्ता आहे. मात्र, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आमदार बाळासाहेब भेगडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार आहे. शिवाय तळेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्षपद इतर मागास वर्ग (महिला) साठी राखीव झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शहर विकास समितीत फूट पाडण्यात विरोधी पक्षाला यश आले आहे. मात्र, सत्तापालट करण्यासाठी नवीन समिकरणे जुळवावी लागणार आहेत. आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, सुलोचना आवारे, अॅड. रवींद्रनाथ दाभाडे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भेगडे, चंद्रकांत शेटे, चंद्रकांत काकडे, सुशील सैंदाणे, नगरसेविका सुरेखा आवारे, समितीचे संस्थापक बाळासाहेब काकडे, तळेगाव शहर आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनवणे, शहर भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र आवारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर) तळेगाव शहराच्या सर्वांगीण विकास व नागरिकांच्या हितासाठी जनसेवा विकास समितीची स्थापना करण्यात आल्याचे निमंत्रक चंद्रभान खळदे व संग्राम काकडे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी सांगितले. आगामी पंचवार्षिक निवडणूक भारतीय जनता पक्ष, तळेगाव जनसेवा विकास समिती, आरपीआय (आठवले गट) ही महायुती करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांनी सांगितले.
शहर समितीत फूट
By admin | Published: October 23, 2016 3:48 AM