शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

शहरवासीयांना आस पालखी रिंगण सोहळ्याची

By admin | Published: July 07, 2015 4:18 AM

चार वर्षांपूर्वी श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील नेत्रदीपक आणि भव्य असा रिंगण सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना पुन्हा या सोहळ्याचा योग कधी येणार

पिंपरी : चार वर्षांपूर्वी श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील नेत्रदीपक आणि भव्य असा रिंगण सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना पुन्हा या सोहळ्याचा योग कधी येणार, याची आस लागली आहे. वाढीव तिथी आल्यानंतरच संस्थान पिंपरीत रिंगण सोहळा घेत असते. मात्र, हा योग दर वर्षी यावा, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. आषाढी वारीतील रिंगणसोहळा म्हणजे भाविकांसाठी पर्वणीच असते. दिवसभराच्या प्रवासानंतर थकलेल्या भाविकांचा उत्साह वाढविण्यासाठी रिंगण सोहळ्याचे आयोजन केले जाते. गोल व उभे असे रिंगणाचे दोन प्रकार आहेत. देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर एकूण सहा रिंगण होतात. गोल रिंगणात सर्वप्रथम दोन्ही अश्व पालखी रथासोबत रिंगणात प्रदक्षिणा करून मध्यभागी येतात. पालखी रथातून उतरवून मध्यभागी ठेवली जाते. त्यानंतर टाळकरी, झेंडेकरी, तुळशी घेतलेल्या महिला, वीणेकरी रिंगण घालतात. त्यानंतर अश्वांचे रिंगण पार पडते. रिंगणात धावणारे अश्व पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. देहूतून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पहिले गोल रिंगण सणसरजवळील बेलवडी येथे पार पडते. पुणे-पिंपरी-चिंचवड शहरापासून बेलवडीचे अंतर सुमारे शंभर किलोमीटर आहे. शहरातील प्रत्येकाला येथील रिंगण सोहळा पाहणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण पिंपरीतील रिंगणाची आतुरनेते वाट पाहतात. मात्र, वाढीव तिथी आली, तरच पिंपरीत रिंगण घेता येते. पालखी सोहळ्याचा कार्यक्रम मराठी महिन्याप्रमाणे आणि तिथीनुसार असतो. दर वर्षी ज्येष्ठ वद्य सप्तमीला पालखी देहूतून प्रस्थान ठेवते. तसेच अमावास्येला बारामतीत पोहोचते. हा कार्यक्रम दर वर्षी ठरलेला आहे. मात्र, अमावास्येपूर्वी एखादी वाढीव तिथी आल्यास एक दिवस अधिकचा मिळतो. याच वाढीव तिथीनुसार २०१० व २०११ या वर्षी पिंपरीत मुक्काम घेण्यात आला. मुक्कामाच्या ठिकाणीच एचए मैदानावर रिंगण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. एचए मैदानावर अक्षरश: एक गावच वसले होते. लागोपाठ दोन वर्षे शहरवासीयांसाठी ती एक पर्वणीच ठरली होती. आबालवृद्धांनी हा नयनरम्य सोहळा डोळ्यांत साठवून ठेवला. आवडीने महिलांसह पुरुषांनी वारकऱ्यांच्या पोशाखात रिंगण सोहळ्याला हजेरी लावत हा सोहळा अनुभवला. या सोहळ्यालाही भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. असाच सोहळा पुन्हा व्हावा, अशी शहरवासीयांची इच्छा आहे. पालखीचा मुक्काम आणि रिंगण सोहळा यामुळे पिंपरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक घरासमोर रांगोळी, भगवी पताका उभारली होती. प्रत्येकाने आपआपल्या परीने वारकऱ्यांची सेवा केली. निवासासाठी घरातील खोली, पटांगण वारकऱ्यांना उपलब्ध करून दिले. जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच, वारकऱ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, परिसर अस्वच्छ होवू नये यासाठी अनेकांनी आपल्या घरातील स्वच्छतागृहदेखील वारकऱ्यांना वापरण्यासाठी दिले होते.