पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी तसेच शहराच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी शहरात कलादालन उभारण्यात येणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.पिंपरी-चिंचवड शहरात कलादालन (आर्ट गॅलरी) उभारणेबाबत महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.या बैठकीस सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य लक्ष्मण उंडे, शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहायक आयुक्त संदीप खोत, विजय खोराटे, कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड, संजय घुबे, प्रशासन अधिकारी रवींद्र जाधव, स्वाती चिंचवडे, उपअभियंता सी. एन. धानोरकर , एस. एन. वाघ, एन. पी. पाटील, चित्रकार सुनील शेगावकर, सचिन काळभोर आदी उपस्थित होते. तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ल्पवयीन अत्याचार
शहरात लवकरच उभारणार कलादालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 3:49 AM