पिंपरी : स्वच्छतेबाबत बेस्ट सिटी पुरस्कार राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मिळाला होता. परंतु भाजपाची दीड वर्षापूर्वी सत्ता आली. स्वच्छतेत शहर महाराष्ट्रात नंबर वन आणि देशात नवव्या क्रमांकावर असणारे शहर स्वच्छतेबाबत ४३ नंबरवर गेले. राहण्यायोग्य शहरांच्या यादीत ६९व्या क्रमांकावर गेले. स्वच्छता अभियानाच्या फक्त जाहिरातीच सुरू आहेत. भाजपाचा कारभार नियोजनशून्य असून, प्रशासनामुळेच अपयश आले आहे. फक्त मलई खाण्यावर लक्ष असून कचऱ्याच्या कामांच्या निविदा निघू शकल्या नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.राहण्यायोग्य शहरांचे निकाल जाहीर झाले. त्यात महापालिकेची क्षमता आणि गुणवत्ता असताना प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका शहरास बसला आहे. विरोधी पक्षनेते साने म्हणाले, ‘‘शहरावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष होते. शहराचा विकास हा भविष्यातील ३० वर्षे डोळ्यासमोर ठेवून केला आहे. शहरातील स्वच्छतेवर जास्त लक्ष देऊन शहराचा चेहरा-मोहरा बदलला. त्यामुळे शहराला बेस्ट सिटी पुरस्कार मिळाला. मात्र, भाजपाची सत्ता येऊन दीड वर्ष झाले, अद्याप कचºयावरची निविदा काढता आली नाही. महानगरपालिका कामगार कायद्यानुसार त्यांना वेतन देते. परंतु ठेकेदार कामगाराचे एटीएम कार्ड व पासबुक स्वत:कडे ठेवून महिन्याला सात ते आठ हजारांवर त्यांची बोळवण करते. कामगाराचा भविष्यनिर्वाह निधीही भरला जात नाही. एखादा दिवस कामगार कामावर गेला नाही, तर भरमसाट दंड करून वेतनातून तो कपात केला जातो. त्यांना सुरक्षिततेची साधने, बूट, ग्लोव्हज् हे वेळेवर पुरविले जात नाही, पुरविले तरी त्याचे पैसे वेतनातून कपात केले जातात. महिला कामगार महापालिका भवनासमोर आंदोलन करीत आहेत.राहण्यायोग्य शहर असताना पहिल्या दहा तर सोडाच, सत्तरावा क्रमांक आला. सल्लागार पोसण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहेत.’’साने म्हणाले, ‘‘हे सर्व ठेकेदार भाजपाच्या पदाधिकाºयांचेच बगलबच्चे आहेत. त्यामुळे त्यांचे धाडस वाढले आहे. सफाई कामगारांनी आंदोलन केले, तरी ते मोडीत काढले जाते. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प मंजूर केला आहे. तोही मलई खाण्यासाठी शहरात ठिकठिकाणी कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे साथीच्या रोगाने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात कचºयाच्या समस्येने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे रोगराईचे संकट डोके वर काढत आहे, तर भाजपाचे पदाधिकारी गुणांकात कमी पडल्यामुळे आपण ४३ नंबरवर असल्याचे सांगत असले, तरी कचºयाची समस्या मोठी आहे. राहण्यायोग्य शहर असताना पहिल्या दहा तर सोडाच, सत्तरावा क्रमांक आला. सल्लागार पोसण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहेत.’’
नियोजनशून्यतेमुळे शहराचे नुकसान; विरोधी पक्षनेत्यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:42 AM