पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्यास आज सुरूवात झाली. शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आॅनलाइन उमेदवारी अर्जांची माहिती घेणे, विविध कक्ष तयार करणे, मतमोजणीची यंत्रणा सज्ज करणे, सुरक्षेच्या उपाययोजना करणे आदी कामे सुरू असल्याचे दिसून आले. प्रशासकीय सज्जता आज दिसून आहे. महापालिकेचा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर प्रारूप मतदारयादी अंतिम केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली. शहरातील १२८ जागांसाठी ३२ प्रभाग आणि प्रत्येक तीन प्रभाग असे ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये तयार केली असून, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी अशा तीन मतदारसंघात ही कार्यालये आठवडाभरापासून सुरू झाली आहेत. आजपासून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात झाली. उमेदवार यादीची प्रतीक्षा असली तरी कोणीही उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. उमेदवारांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे. इच्छुक उमेदवारांना यादीची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)
शहरात महासंग्राम सुरू
By admin | Published: January 28, 2017 12:25 AM