लोणावळा : पर्यटनाचे माहेरघर असलेल्या लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात स्वच्छ शहराचे नामांकन मिळवून देण्यासाठी शहरातील स्थानिक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. कलाकारांच्या संकल्पनेतून शहरातील रिकाम्या भिंतींवर स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश देणारी छायाचित्रे रेखाटण्याची कामे सुरु करण्यात आले. दोन दिवसांत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगतची भिंत रंगवत उद्बोधक संदेश देणारी चित्रे बनविण्यात आलेली आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०१८करिता शहर सज्ज झाले असून, लोकप्रतिनिधी व अधिकारी, कर्मचारी,आर्टिस्ट ग्रुप, संघटना, शाळा व नागरिक यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा विडाच उचलण्यात आला आहे. लोणावळा आर्टिस्ट ग्रुपच्या २५ सदस्यांनी शहराला आकर्षक बनविण्यासाठी आपल्या कुंचल्याच्या व रंगछटाच्या माध्यमातून पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. गवत व मातीने भरलेल्या भिंतीवर आकर्षक रंगछटा व कलाकृती साकारली गेल्याने त्या भिंती नागरिकांच्या आकर्षण बनू लागल्या आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुंरदरे यांनी भेट देत कलाकारांचे कौतुक केले. आर्टिस्ट ग्रुपने पर्यटकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी भिंतीवर संदेशपर चित्र रंगविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये कलाशिक्षक राजेंद्र दिवेकर, सचिन कुटे, धनंजय होनग्गी, बंडू येवले, प्रमोद प्रांचाळ, दत्ता थोरात, संजोग पिसे, सागर तावरे, विशाल केदारी, नितीन तावरे, विशाल बोडके, अभिषेक दरेकर, योगेश पाळेकर, नितीन कल्याण, शिरीष बडेकर, विशाल कुडले, नितीन तिकोणे, दिनेश पवार, भानुप्रिया शर्मा, हिना परमार, स्वराली मुंदरगी, कोलम दुर्गे, स्नेहल राणे, यशश्री तावरे, सुनील गायकवाड, योगेश शिवा, गौरव राशिंगकर, योगेश अंभुरे यांचा समावेश आहे.
पर्यटकांत उत्सुकता : स्वच्छता मोहीमपर्यटक भिंती व चित्रे पाहण्यासाठी आवर्जून थांबत आहेत. शहरातील सर्व भिंती याच धर्तीवर रंगवत स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. वेगवेगळे ग्रुप सकाळच्या सत्रात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहेत. स्वच्छता अॅपच्या माध्यमातून स्वच्छताविषयक समस्या सोडविल्या जात असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळावा याकरिता झोपडपट्टी भागात प्रत्येकी दोन डस्टबीनचे वाटप सुरु केले आहे. आर्टिस्ट ग्रुपने पर्यटकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी भिंतीवर संदेशपर चित्र रंगविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुंरदरे यांनी भेट देत कलाकारांचे कौतुक केले.