शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळ्याची आघाडी, पिंपरी-चिंचवड शहर पुन्हा पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 1:47 AM

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये लोणावळा शहराला पश्चिम भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे स्वच्छ शहर हा पुरस्कारप्राप्त झाला.

लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये लोणावळा शहराला पश्चिम भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे स्वच्छ शहर हा पुरस्कारप्राप्त झाला. दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते लोणावळा नगर परिषदेला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहराचा आज दिल्लीत स्वच्छतेच्या बाबतीतदेखील डंका वाजला आहे.नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, स्वच्छता व आरोग्य विभागाच्या सभापती संध्या खंडेलवाल, माजी सभापती पूजा गायकवाड, ब्रिंदा गणात्रा यांनी हा सन्मान स्वीकारला. या वेळी मावळचे आमदार संजय भेगडे, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, नगरसेवक राजू बच्चे, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब जाधव, रघुवीर शेलार, वीज वितरण समितीचे सदस्य सुनील तावरे उपस्थित होते.स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू होण्यापूर्वीपासून म्हणजेच २०१७ पासून लोणावळा शहरात स्वच्छतेचा जागर सुरूझाला होता. मागील दोन वर्षांत नगर परिषदेने घरोघरचा कचरा शंभर टक्के गोळा करण्याचे शिवधनुष्य पेलले. सोबतच शहरातील सर्व कचराकुंड्या हटवून लोणावळा शंभर टक्के कचराकुंडीमुक्त बनविले. घरोघरी जाऊन नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल्याने नागरिकांनीदेखील शहर स्वच्छ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.वरसोली येथील कचरा डेपोवर बायोगॅस प्रकल्प, तसेच कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविला. या सर्व कार्याची दखल घेत लोणावळा शहराला पश्चिम भारतातील दुसºया क्रमाकांचे स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आहे. मागील वर्षी लोणावळा या स्पर्धेत सातव्या स्थानावर होते. वर्षभराच्या काळात लोणावळा शहराने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहेत. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी लोणावळा शहरातील सर्व नागरिक, नगर परिषदेचे सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व शहरातील विविध सामाजिक संघटना यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश असल्याचे सांगत सदरचा पुरस्कार या सर्व घटकांना समर्पित करीत असल्याचे म्हटले आहे.>गुणांकन पद्धती या वर्षी बदलली आहे. चार हजार शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच कचरा विलगीकरण, प्रक्रियेसाठी असणारे गुण अधिक मिळू शकले नाही. घरोघरचा कचरा गोळा करणे आणि विलगीकरणाची निविदा मंजूर झाली आहे. प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर याविषयीच्या गुणांत वाढ होणार आहे. तसेच १०० सदनिकांपेक्षा अधिक गृहनिर्माण सोसायट्यांना आपला कचरा जिरविण्यासंदर्भात सूचना केली आहे. मात्र, शंभर टक्के अंमलबजावणी झाली नाही. पुढील वर्षी सुधारणा करून अधिक गुण मिळण्यासाठी प्रयत्न करू.- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त>स्वच्छ भारत अभियानात पिछाडी झाली आहे. आपण अधिक गुणांकन वाढावेत अधिक प्रयत्न करीत आहेत. शहर स्वच्छ रहावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही कालखंडात कचरा संकलन आणि विलगीकरणाची निविदा प्रक्रिया रखडली होती. न्यायप्रवीष्ट बाबी होत्या. निविदा प्रक्रियेस हिरवा कंदील मिळाल्याने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. कचरा विलगीकरण आणि संकलनासाठी अधिक गुण आहेत. पुढील वर्षी हे गुण वाढतील. आपला स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. स्वच्छ सर्वेक्षणातही गुणांकन वाढेल. - राहुल जाधव, महापौर>राष्टÑवादी काँग्रेसच्या कालखंडात बेस्ट सिटी म्हणून गौरविलेले पिंपरी-चिंचवड आता कचरासिटी म्हणून परिचित झाले आहे. ४२ व्या क्रमांकावरून ५२ वर शहर फेकले गेले आहे. हे प्रशासनाचे जसे अपयश आहे. तसेच सत्ताधारी भाजपाचेही अपयश आहे. त्यांनी कचरासिटी असा लौकिक मिळवून दिला आहे. कचºयाची समस्याही गंभीर बनली आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविणाºया सत्ताधाऱ्यांचे महापालिकेच्या कचरा प्रश्नाकडे लक्ष नाही. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे.- दत्ता साने, विरोधी पक्षनेते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड