पिंपरी : महापालिकेच्या वतीने विविध प्रकल्पांवर लूट सुरू आहे. अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जात आहे. महापालिकेच्या वतीने काळेवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या स्मशानभूमीत कोल्ड स्टोअरेज बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणल्याचे उघड झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रस्तावाचा पोलखोल केल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने काळेवाडी, लिंक रोड येथील त्रिलोक स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. स्मशानभूमी बांधण्याबरोबच त्यात कोल्ड स्टोअरेजची सुविधा बांधण्यात येणार आहे. हे काम ९.९९ टक्के कमी दराने निविदा भरणाºया अंबिका कॅन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यास प्रशासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यासाठी एकूण ३ कोटी ७४ लाख खर्च अपेक्षित धरला आहे. स्थायी समोर सादर केलेल्या याविषयात स्मशानभूमीत कोल्ड स्टोअरेज उभारण्याचा उल्लेख नव्हता. ही बाब सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर सदस्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.मात्र, स्मशानभूमीवर एवढा खर्च कसा काय? या खर्चाच्या विषयाचा खुलासा करताना स्मशानभूमी नूतनीकरणाच्या कामात कोल्ड स्टोअरेजची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे, असे अधिकाºयांनी सांगताच सर्व सदस्यांनी जोरदार टीका केली. त्यावेळी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी प्रशासनास धारेवर धरले.सदस्यही आक्रमकस्मशानभूमीत कोल्ड स्टोअरेज उभारण्याचा विषय सदस्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. सभेसमोर विषय पत्र सादर करताना प्रशासनाने त्यात परिपूर्ण माहिती देण्याची गरज आहे. माहिती लपविल्यास शंकेस वाव मिळतो आणि नाहक टीकेलाही बळी पडावे लागते. त्यामुळे प्रशासनाने पूर्ण माहिती असणारे विषय पत्रिकेवर आणण्याची गरज आहे.विलास मडिगेरी म्हणाले, रुग्णालय आणि डेड हाऊसमध्ये मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेजची सुविधा असते. स्मशानभूमीत अशी सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. तसेच विषय पत्रात काम कोणत्या प्रकारे होणार त्यातील घटक याविषयी प्रशासनाने उल्लेख करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या कामातून कोल्ड स्टोअरेज उभारण्याचे काम वगळण्याची गरज आहे. कोल्ड स्टोअरेजची सुविधा वगळून हा प्रस्ताव फेरसादर करावा.ह्णह्ण त्यानंतर प्रशासनाने स्मशानभूमीचा विषय मागे घेतला.
पिंपरी महापालिकेच्या वतीने स्मशानभूमीत " कोल्ड स्टोअरेज " बांधण्याचा प्रकार उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 7:43 PM
काळेवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या स्मशानभूमीत कोल्ड स्टोअरेज बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणल्याचे उघड
ठळक मुद्देया प्रस्तावाचा पोलखोल केल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की रुग्णालय आणि डेड हाऊसमध्ये मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेजची सुविधा