शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

उद्योग व्यवसायांची तात्काळ माहिती संकलित करा, औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसवा - डॉ. नीलम गो-हे

By विश्वास मोरे | Published: December 10, 2023 3:22 PM

पिंपरी चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात झालेल्या दुर्घटना स्थळाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाहणी केली

पिंपरी: धोकादायक आणि घातक पदार्थांमुळे अपघात होऊ शकतो अशा पदार्थांचा वापर आणि साठा करणाऱ्या पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योग व्यवसायांची तात्काळ माहिती संकलित करा, औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिले

पिंपरी चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात झालेल्या दुर्घटना स्थळाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार उमा खापरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक केशव घोळवे, शांताराम भालेकर, पंकज भालेकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उप आयुक्त मनोज लोणकर, सहायक आयुक्त सीताराम बहुरे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, औद्योगिक सुरक्षा संचलनालयचे संचालक देवीदास गोरे, सहसंचालक अखिल घोगरे, उपसंचालक योगेश पतंगे, तहसीलदार अर्चना निकम, पोलीस उपआयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त पद्माकर घनवट आदी उपस्थित होते.

गोऱ्हे म्हणाल्या, तळवडे येथे घडलेली आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेतील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे त्या म्हणाल्या. कामगारांची सुरक्षा हा महत्त्वाचा प्रश्न असून औद्योगिक क्षेत्रात काम करणा-या सर्व कामगारांसाठी सुरक्षात्मक उपाययोजना असणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अग्नि सुरक्षा सर्वेक्षण सुरू आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असुन धोकेदायक परिस्थितीमध्ये तसेच स्फोटकांचा वापर करणा-या उद्योगांची माहिती संकलित करण्याचे काम तातडीने पुर्ण करावे, अशा सूचना डॉ. गो-हे यांनी दिल्या. औद्योगीक क्षेत्रात सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी औद्योगिक आस्थापनांना निर्देश द्यावेत, असे देखील डॉ. गो-हे यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, तळवडे आग दुर्घटनेतील जखमी रूग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ससून रुग्णालयामध्ये मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि २ मदतनीस यांची २४x७ नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNeelam gorheनीलम गो-हेFire Brigadeअग्निशमन दलGovernmentसरकार