पिंपरी : इंधन दरवाढ, महागाई वाढीच्या मुद्द्यावर भाजपा सरकारविरोधात शहर काँग्रेस पक्षाने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. त्याला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकात निषेध आंदोलन केले. तर मनसेने पुणे-मुंबई महामार्गावर रस्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली.शहर काँग्रेसने केलेल्या आंदोलनात शहराध्यक्ष सचिन साठे, कविचंद भाट, कैलास कदम,नसीर शेख, गौरव चौधरी, संग्राम तावडे,नरेंद्र बनसोडे,गिरीजा कुदळे, बाळासाहेब साळुंखे, मयूर जयस्वाल आदींनी सहभाग घेतला. त्याचबरोबर मनसेच्या वतीने पिंपरी महापालिकेसमोर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर इंधन दरवाढीविरोधात निदर्शने करण्यात आली. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली ग्रेड सेपरेटरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. या वेळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन थोड्या वेळाने सोडून दिले. दरम्यान, शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महापालिका, शासकीय कार्यालये सुरू होती. बाजारपेठेतील दुकानेही नेहमीप्रमाणे उघडलेली होती. काही भागात मात्र दुकाने बंद ठेवण्यात आला होता. पीएमपी सेवा सुरळित सुरू होती.पुण्यात पाच पीएमपीच्याबसच्या फोडल्या काचाभारत बंद दरम्यान शहरात आंदोलकांनी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या पाच बसेसच्या काचा फोडल्या आहेत. तर तीन बसेसच्या टायरमधील हवा सोडण्याच्या घटना घडल्या.एका ठिकाणी चालकालाकिरकोळ मारहाणही करण्यातआली. यामध्ये ‘पीएमपी’चे ४५ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.>आंदोलनासाठी विरोधी पक्षांची एकजूटपिंपरी : पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्ष व इतर पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. बंदच्या आंदोलनमध्ये राष्टÑवादीसह विरोधी पक्षांनी पिंपरीत निदर्शने करून एकजूट दाखविली.शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बंदला पाठिंबा देताना शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, की पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर यात अवास्तव दरवाढ झाली आहे. आघाडी सरकारच्या काळातील दर व आत्ताचे दर पाहता यामध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. हे या भाजपा-शिवसेना सरकारचे अपयश आहे. या आंदोलनावेळी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, फजल शेख, विजय लोखंडे, विशाल वाकडकर, विशाल काळभोर, गंगा धेंडे, संतोष वाघेरे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.मनसेच्या कार्यकर्त्यांची अटक, सुटकापिंपरी : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर भाजपा सरकारच्या निषेधार्थ पिंपरीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केले. रास्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले. या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह १३ जणांचा समावेश आहे. अश्विनी राजेश बांगर, सीमा जितेंद्र बेलापूरकर, अनिता बालाजी पांचाळ, रूपाली चंद्रकांत गिलबिले,स्नेहल प्रशांत बांग, अदिती विष्णू चावरिया,शोभा विष्णू चावरिया, दत्ता भाऊराव देवतरासे, अक्षय बबन नाळे, मयूर राजेंद्र चिंचवडे,विशाल शिवाजी मानकरी, नितीन किसन चव्हाण यांना अटक करून सोडून देण्यात आले.
काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला उद्योगनगरीत संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:37 AM