Pimpri Chinchwad: काँग्रेसचा भोसरी, चिंचवड, पिंपरीवर दावा; तीन जागांसाठी २२ जणांनी दिल्या मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:35 PM2024-10-16T15:35:32+5:302024-10-16T15:36:04+5:30

पक्षातील सर्वसामान्य कुटुंबातील कोणत्याही निष्ठावंत सैनिकास एकमताने उमेदवारी द्यावी, पक्षश्रेष्ठींना साद घातली

Congress claims Bhosari, Chinchwad, Pimpri; 22 people gave interviews for three seats | Pimpri Chinchwad: काँग्रेसचा भोसरी, चिंचवड, पिंपरीवर दावा; तीन जागांसाठी २२ जणांनी दिल्या मुलाखती

Pimpri Chinchwad: काँग्रेसचा भोसरी, चिंचवड, पिंपरीवर दावा; तीन जागांसाठी २२ जणांनी दिल्या मुलाखती

पिंपरी: विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. काँग्रेसने शहरातील तिन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. पुण्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहरातील मतदारसंघ काँग्रेसला घेण्यासाठी मागणी करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसकडे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज केले होते. पुण्यातील काँग्रेस भवन येथे पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघातील उमेदवारांच्या निरीक्षक आमदार यशोमती ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, पुणे शहराचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, पुणे लोकसभा निरीक्षक अजित दरेकर आदी उपस्थित होते.

कैलास कदम म्हणाले की, इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. पक्षातील सर्वसामान्य कुटुंबातील कोणत्याही निष्ठावंत सैनिकास एकमताने उमेदवारी द्यावी, अशी पक्षश्रेष्ठींना साद घातली.

यांनी दिल्या मुलाखती

चिंचवड मतदारसंघातून डॉ. कैलास कदम, संदेश नवले, तुकाराम भोंडवे, प्रियंका मलशेट्टी- कदम, सज्जी वर्की, सायली नढे, शशी नायर, राजन नायर, भरत वाल्हेकर यांनी तर पिंपरी मतदार संघातून विश्वनाथ जगताप, मनोज कांबळे, बाबासाहेब बनसोडे, गौतम आरकडे, शामला सोनवणे, ज्योती गायकवाड, डॉ. मनीषा गरुड, चंद्रकांत लोंढे, पंकज बगाडे, अर्चना राऊत यांनी भोसरी मतदार संघातून सोमनाथ शेळके, विठ्ठल शिंदे, स्मिता पवार यांनी मुलाखती दिल्या.

पाच वर्षांत वाढले ३ लाख मतदार

विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. निवडणूक आयोगाने मतदार जाहीर केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्यावेळी २०१९ ला १३ लाख ६३ हजार ५६१ मतदार होते. तर आजअखेर १६ लाख ४३ हजार ८२२ मतदार नोंद आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ३ लाख ७९ हजार २६१ मतदारांची भर पडली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मतदारांत भर पडली आहे.

Web Title: Congress claims Bhosari, Chinchwad, Pimpri; 22 people gave interviews for three seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.