मावळ विधानसभेसाठी काँग्रेसचा आग्रह, मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 01:36 AM2018-11-17T01:36:52+5:302018-11-17T01:37:20+5:30

मुंबईत बैठक : कार्यकर्त्यांचे साकडे

Congress urges Maval assembly, meeting of party workers in Mumbai | मावळ विधानसभेसाठी काँग्रेसचा आग्रह, मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक

मावळ विधानसभेसाठी काँग्रेसचा आग्रह, मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक

googlenewsNext

वडगाव मावळ : मावळ विधानसभेची जागा काँगे्रसला मिळावी, अशी मागणी मावळ तालुक कॉँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. मावळ लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली. या वेळी ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, दिलीप ढमाले, यादवेंद्र खळदे, रोहिदास वाळुंज, यशवंत मोहोळ, संभाजी राक्षे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मावळ मतदारसंघात विधानसभेच्या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा चार वेळा पराभव झाला आहे. या मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार कॉँग्रेस पक्षाकडे आहे.लोणावळा नगरपालिकेत पक्षाचे सात, देहूरोड येथे दोन, तळेगाव येथे दोन असे नगरसेवक आहेत. माऊली दाभाडे यांच्या प्रवेशाने ग्रामीण भागात पक्षाची ताकत वाढली आहे. या सर्व बाबींचा विचार करून मावळची जागा कॉँग्रेसला मिळावी, अशी मागणी करण्यात आली. मावळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. या निवडणुकीकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसची आघाडी होणार आहे. ज्या वेळी मावळ मतदारसंघाची चर्चा होईल, या जागेची अदलाबदल करून कॉँग्रेसला द्यावी, अशी मागणी केली जाईल.’’
 

Web Title: Congress urges Maval assembly, meeting of party workers in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.