शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

लोणावळ्यातील मंडल अधिकारी कार्यालय मोजतेय अखेरची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 4:11 PM

लोणावळा,खंडाळा ते वाकसई व परिसरातील अनेक गावांचे मंडल कार्यालय या इमारतीमध्ये

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : ब्रिटिशकालीन इमारतीत चालतेय कामकाज; दुरुस्ती न झाल्याने धोका

लोणावळा : लोणावळा मंडल कार्यालयाची इमारत मागील अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत अखेरची घटका मोजत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाणारा लाकडी जिना कुजून तुटल्याने या ठिकाणी लोखंडी जिना बनविण्यात आला आहे. असे असले तरी बाल्कनी वजा व्हरांड्याच्या फळ्या कुजलेल्या असल्याने जीव मुठीत धरून कार्यालयात जावे लागत आहे.लोणावळा नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या समोर मंडल कार्यालय, भूमीअभिलेख, पशुवैद्यकीय दवाखाना, तलाठी कार्यालय, स्टँप विक्रेते अशी बहुउद्देशीय इमारत आहे. ब्रिटिश काळात ही इमारत बांधण्यात आली आहे. मागील काही काळापासून या इमारतीची देखभाल दुरुस्ती झालेली नसल्याने ती सध्या अखेरची घटका मोजत आहे. लोणावळा,खंडाळा ते वाकसई व परिसरातील अनेक गावांचे मंडल कार्यालय या इमारतीमध्ये असल्याने येथे सतत नागरिकांची महसुली कामाकरिता वर्दळ असते, लोणावळा तलाठी कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय तसेच स्टँम्प खरेदी करिता ही इमारत सतत गजबजलेली असते. सदर इमारत ही धोकादायक बांधकाम बनल्याने ती केव्हाही पडू शकते. शासनाला वर्षानुवर्षे लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणाºया या इमारतीमध्ये अधिकारी व कर्मचारी यांना जीव मुठीत धरुन काम करावे लागत असून नागरिकांना देखिल जीवावर उधार होऊन इमारतीमध्ये जावे लागत आहे. मंडल कार्यालयाच्या या इमारतीच्या नुतनीकरणाचे दोनवेळा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत मात्र शासनाच्या लातफिती कारभाराचा फटका याठिकाणी शासकिय कार्यालयालाच बसला आहे. प्रस्तावाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याने त्यामध्ये कसलीही प्रगती झालेली नाही. वास्तविक लोणावळा मंडल कार्यालयाला मुबलक जागा उपलब्ध  असल्याने याठिकाणी सध्याची जिर्ण झालेली इमारत पाडून नुतन प्रशासकिय इमारती बनविल्यास लोणावळा शहराच्या नावारुपाला साजेल सुसज्ज अशी प्रशासकिय इमारत तयार होऊ शकते. चांगली वास्तु निर्माण झाल्यास येथिल अधिकारी व कर्मचारी यांच्यात काम करण्याचा उत्साह देखिल येऊन कामाच्या गतीत वाढ होईल यात शंका नसल्याने मावळच्या महसुल अधिकाºयांनी सदर इमारत नुतनीकरणाकरिता पाठपुरावा करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.........धोकादायक इमारत : लोणावळा मंडल कार्यालयाचे कामकाज ब्रिटिशकालीन इमारतीत सुरू आहे. ही इमारत धोकादायक झालेली असून, येथे दुर्घटनेची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.............इमारतीला धोकादायक जाहीर करावेलोणावळा मंडल कार्यालयाची इमारत जिर्ण झालेली असताना तीच्या दुरुस्तीकडे शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग दुलर्क्ष करत आहे. त्यामुळे सदरची इमारत धोकादायक जाहिर करण्यात यावी. तसेच येथील कारभार इतरत्र हालवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. धोकादायक इमारतीमध्ये अधिकारी व कर्मचारी जीव मुठीत धरुन काम करत आहेत. नागरिकांना देखिल धोका पत्कारत महसुली कामांकरिता याठिकाणी जावे लागत आहे. याठिकाणी काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

टॅग्स :lonavalaलोणावळा