पिंपरी : येथील जुना पुणे-मुंबई महामार्गावर मोरवाडीत ग्रेड सेपरेटरमध्ये दुपारीच्या सुमारास कंटेनर बंद पडला आहे. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातून जुना पुणे-मुंबई महामार्ग जातो. निगडी ते दापोडी असा ग्रेड सेपरेटर तयार केला आहे. त्यात मोरवाडी जवळील ग्रेड सेपरेटरमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास एक कंटेनर बंद पडला.
हा कंटेनर नुसता बंद नाही पडला तर ग्रेड सेपरेटरमधील जाणाऱ्या दोन्ही लेनवर तिरका झाला. त्यामुळे ग्रेड सेपरेटर ब्लॉक आला. त्यामुळे पुण्याकडून निगडीकडे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा आला. पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे ग्रेड सेपरेटर मधून बाहेर येणारी आणि पेट्रोल पम्पाकडून ग्रेडसेप्रेटरमध्ये जाणारी वाहने अडकून पडली. त्यामुळे मोरवाडी ते एच ए कंपनी अशा एक किलोमीटरपर्यंतपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी आले आहे. त्यांनी कंटेनर सरळ करण्याचे काम सुरु ठेवले आहे.
पाच तास कोंडी -
ग्रेडसेप्रेटरमध्ये कंटेनर अडकल्याने कंटेनरवरील सामान खाली करून परत भरावे लागल्याने वाहतूककोंडी सकाळी नऊ-साडेनऊ वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत होती.