शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

ठेकेदार झाले महापालिकेचे कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 1:37 AM

स्थायी समितीमध्ये संगनमत : निविदा प्रक्रियेत रिंग करून नागरिकांच्या पैशांची लूट

पिंपरी : महापालिकेतील सुमारे एक कोटीपेक्षा अधिक रकमेच्या निविदा प्रक्रियेत ठरावीक ठेकेदारच दिसून येत आहेत. संबंधित ठेकेदार निविदा प्रक्रियेत ‘रिंग’ करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करीत आहेत.

स्थायी समितीमध्ये रस्ते विकास व वायसीएम रुग्णालयातील निविदेवरून सदस्यांचे एकमत होत नसल्याने सभा दोन वेळा तहकूब केली. त्यानंतर ठेकेदारांनी सदस्यांना पुरेसा आर्थिक वाटा दिल्यानंतर एका दिवसात सुमारे ३५७ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. रस्त्याच्या विकास कामांसाठी कोट्यवधींच्या तरतुदी करण्यात आली़ मात्र, शहरातील विकासकामे विविध ठिकाणी असली, तरी ठेकेदार मात्र ठरावीकच आहेत.वाकडच्या कामात रिंग : मयूर कलाटेपिंपळे निलख-वाकड या प्रभागातील निविदा प्रक्रियेत ठेकेदारांनी रिंग केली असून, त्यामध्ये स्थायी समितीचे सदस्य व अधिकारी यांच्याशी संगनमत आहे. त्यामुळेच काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक रस्त्यासाठी सुनील आजवाणी, पिंक सिटी रस्त्यासाठी एच. सी. कटारिया, वाकड-पिंपळे निलख या रस्त्यासाठी कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर व कस्पटे वस्ती येथे गॅबियन भिंत बांधण्यासाठी एस. एस. साठे यांनी निविदा भरली आहे. प्रत्येक निविदा संंबंधित ठेकेदार वाटून घेत आहेत, असा आरोप मयूर कलाटे यांनी केला आहे.अधिकाºयांशी संगनमत : दत्ता साने४राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणाºया भाजपाने सत्तेत आल्यापासून ठेकेदारांमार्फत महापालिकेचा कारभार सुरू केला आहे. शहराच्या विविध भागांतील विकासकामे एस. साठे, क्रिपलानी, सुनील आजवाणी, धनेश्वर कन्स्ट्रक्शन, घोसे, लालदीप, प्रथमेश व देव कन्स्ट्रक्शन या काही ठरावीक ठेकेदारांमार्फत सुरू आहे. हा प्रकार महापालिका आयुक्त यांच्या संमतीने सुरू आहे, असा आरोप दत्ता साने यांनी केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड