रावेत : वाल्हेकरवाडी येथील भोंडवे वस्तीतील शिवतीर्थ कॉलनीतील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र रस्ता स्वच्छ न करता, तसेच कमी प्रमाणात डांबर वापरून रस्त्याचे काम सुरू आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. संबंधित बहिरट ब्रदर्स या ठेकेदाराच्या मद्यपी पर्यवेक्षकाने या वेळी तक्रार करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला.
वाल्हेकरवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे गेल्या दहा वर्षांपासून डांबरीकरण झाले नव्हते, अशा रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. रस्ता स्वच्छ करून त्यावर डांबर ओतून खडीकरण करणे आवश्यक असते. मात्र शिवतीर्थ कॉलनीत रस्ता स्वच्छ न करताच कमी प्रमाणात डांबराचा वापर करून डांबरीकरण केले जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली. त्यामुळे उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी या कामाची पाहणी केली. काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत त्यांनी काम बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर संबंधित ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाºयांनी कामाची पाहणी केली. रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे, अशा सूचना कनिष्ठ अभियंता मोने यांनी केल्या.
शिवतीर्थ कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण नियमानुसार योग्य पद्धतीने करण्यात यावेत, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे. संंबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत आहेत त्याबाबत ठेकेदाराच्या पर्यवेक्षकास सांगितले असता त्यांच्याकडून बेजबाबदारपणाची उत्तरे दिली जातात. त्यामुळे या कामाची नेमकी जबाबदारी कोणाची असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
महापालिका प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत का?
असाही प्रश्न नागरिकांकडून यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला. रस्त्याच्या कामाची पाहणी करताना कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांच्यावर स्थानिक नागरिकांनी विविध प्रश्नांची सरबत्ती केली. संतप्त नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी मोने यांनी डांबरीकरणाचे काम बंद करण्याच्या सूचना ठेकेदारांस दिल्या. तसेच संबंधित रस्त्याचे डांबरीकरण नव्याने व दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे, अशाही सूचना दिल्या. त्यामुळे नागरिक आश्वस्त झाले.ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाकडून उडवाउडवीची उत्तरेठेकेदाराने महापालिकेचे नियम धाब्यावर बसवून काम सुरू केले आहे. या कामासाठीचे डांबर हलक्या दर्जाचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी निकृष्ट कामे करून केली जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. संबंधित अधिकारीही या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे. याबाबत ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाला विचारले असता, मद्याच्या नशेतील पर्यवेक्षकाने, काय करायचं ते करा,’ असे सांगून बेजबाबदारपणे उडवाउडवीची उत्तरे स्थानिकांना दिली.
शिवतीर्थ कॉलनीत डांबरीकरणाचे काम नियमानुसार न करता केवळ करायचे म्हणून ठेकेदाराने केले. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली. कामाची पाहणी केली असता निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केलेले निदर्शनास आले. याबाबत संबंधित ठेकेदार आणि अभियंता यांना रस्ता पुन्हा करण्याचे सांगण्यात आले आहे. - सचिन चिंचवडे, उपमहापौरसदर कामाची पाहणी केली असता, एका ठिकाणी मारण्यात आलेला पॅच निकृष्ट आढळून आला. तो पॅच जेसीबीच्या साह्याने काढून तेथे योग्य पद्धतीने काम करण्याचे आदेश दिले आहेत. ़नागरिकांच्या मागणीनुसार योग्य पद्धतीने अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, त्याबाबत यापुढे काळजी घेतली जाईल.- उमेश मोने, कनिष्ठ अभियंता, ब प्रभाग